रत्नागिरी : सिद्धिविनायक नगर येथे रिक्षा स्टॉपचा शुभारंभ

Sep 11, 2024 - 11:38
Sep 11, 2024 - 13:37
 0
रत्नागिरी : सिद्धिविनायक नगर येथे रिक्षा स्टॉपचा शुभारंभ

रत्नागिरी : शहरातील शिवाजीनगर येथील सिद्धिविनायक नगर रिलायन्स मॉलबाहेर किरणोदय शिवसेनाप्रणीत रिक्षा चालक मालक संघटनेच्या स्टॉपचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक राजन शेट्ये, माजी नगरसेवक सुदेश मयेकर, शिवसेना शहर संघटक सौरभ मलुष्टे, दीपक पवार यांच्या उपस्थितीत या थांब्याच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी किरणोदय शिवसेनाप्रणित संघटनेचे शहराध्यक्ष रशिद हकीम, कार्याध्यक्ष संतोष सावंत, उपशहरप्रमुख इरफान खान यांच्यासोबत सिद्धिविनायक स्टॉपचे अध्यक्ष गणेश शिंदे, उपाध्यक्ष मुन्ना मापारी, सचिव प्रसाद नार्वेकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रवाशांना उत्कृष्ट सेवा पुरवण्यात यावी, असे आवाहनही करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:06 PM 9/11/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow