पी. टी. उषा मला भेटण्यासाठी नाही तर फोटो काढण्यासाठी आल्या होत्या; विनेश फोगाटचा गंभीर आरोप

Sep 11, 2024 - 13:55
 0
पी. टी. उषा मला भेटण्यासाठी नाही तर फोटो काढण्यासाठी आल्या होत्या; विनेश फोगाटचा गंभीर आरोप

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरी गाठून भारतासाठी पदक निश्चित करणाऱ्या अनुभवी कुस्तीपटू विनेश फोगाटला सामन्यापूर्वी वजन वाढलेल्यामुळे अपात्र घोषित करण्यात आले.

या निर्णयाने विनेश फोगाटला धक्का बसला. त्यानंतर तिने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. आता विनेश फोगाटने राजकारणात प्रवेश केला आहे, दरम्यान विनेश फोगाटने भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या प्रमुखावर मोठा आरोप केला आहे.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या प्रमुख पीटी उषा यांनी शेअर केलेल्या फोटोवर विनेश फोगाटने नाराजी व्यक्त केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हाचे हे फोटो आहेत. त्यावेळी पीटी उषा तिला भेटायला आल्या होत्या. या भेटीदरम्यान पीटी उषा यांनी विनेश फोगटसोबतचा एक फोटो क्लिक केला होता जो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

राजकारण केल्याचा आरोप

पण विनेश फोगाटने राजकारण केल्याचा आरोप केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विनेश फोगाटने सांगितले की, तिला तिथे कोणताही पाठिंबा मिळाला नाही. पीटी उषा मॅडम भेटायला हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. फोटोही क्लिक झाला. बंद दाराआड राजकारणात बरेच काही घडते. त्याचप्रमाणे तिथेही राजकारण झाले. म्हणूनच मी कुस्ती सोडली, पण अनेकजण म्हणणारे होते कुस्ती सोडू नको.

विनेश फोगटचा आरोप आहे की, हा फोटो कोणतीही माहिती न देता काढण्यात आला आणि सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहे, जिथे बाहेरचे जीवन कसे चालले आहे याची तुम्हाला कल्पना नाही. तुम्ही आयुष्याच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहात. अशा परिस्थितीत तुम्ही मला न सांगता फोटो काढत आहात हे दाखवण्यासाठी माझ्यासोबत उभे आहात. हे फक्त राजकारण आहे.

कुस्तीतून निवृत्ती घेतल्यानंतर विनेश फोगाटने नुकतेचा काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसने तिला हरियाणा निवडणुकीतही तिकीट दिले आहे. आता ती हरियाणाच्या जुलाना मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे आणि नवी इनिंग सुरू करणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow