रत्नागिरी : गणेशोत्सवात गावी आलेले ४३३ चाकरमानी आजारी

Sep 16, 2024 - 12:48
Sep 16, 2024 - 12:50
 0
रत्नागिरी : गणेशोत्सवात गावी आलेले ४३३ चाकरमानी आजारी

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी हजारोंच्या संख्येने मुंबईकर गावाकडे दाखल झाले आहेत. साथीच्या आजारांना प्रतिबंध होण्यासाठी गेल्या आठ दिवसांत गावाकडे येणाऱ्या मुंबईकारांची मुंबई-गोवा महामार्गावर आरोग्य पथकाकडून तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४३३ मुंबईकर आजारी असल्याचे आढळले. या सर्वांवर आरोग्य पथकाकडून प्राथमिक उपचार करण्यात आले.

गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांच्या तपासणीसाठी मुंबई गोवा महामार्ग तसेच अन्य मार्गावर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आरोग्य तपासणी केंद्र उभी केली आहेत. जिल्ह्यात ३ सप्टेंबरपासून ही पथके तैनात करण्यात आली आहेत.

जिल्ह्यातील बसस्थानक, रेल्वेस्थानक व महामार्गावर वैद्यकीय तापसणी व माहिती केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. त्याद्वारे मुंबईकरांची आरोग्य तपासणी व त्यांना प्रतिबंधात्मक उपचार तसेच खबरदारी विषयक मार्गदर्शन केले जात आहे. त्याठिकाणी कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी, कर्माचाऱ्यांनी मुंबईकरांची आजारासंबंधी तपासणी केली. सध्या पावसाचा हंगाम असून जिल्ह्यात सर्दी, तापाची साथ आहे. त्यातच अनेकांना डेंग्यू, मलेरियाचीही लागण झालेली आहे. सर्दी, तापाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या मुंबईकरांची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाची पथके तैनात ठेवण्यात आली आहेत, ही आरोग्य पथके १९ सप्टेंबर पर्यंत कार्यरत राहणार आहेत. आरोग्य पथकांनी केलेल्या तपासणीत ४३३ जण आजारी सापडले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:17 PM 16/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow