रत्नागिरीत पर्यटन दिनानिमित्त रिल स्पर्धेचे आयोजन

Sep 16, 2024 - 14:29
 0
रत्नागिरीत पर्यटन दिनानिमित्त रिल स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : रत्नागिरी सहकारी पर्यटन संस्थेच्या पर्यटनदिनानिमित्त रिल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 'कोकण पर्यटन व शांतता आणि कोकण पर्यटन' या विषयावर रिल बनवायची आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे. व्हिडिओ हा दिलेल्या स्पॉटवर शूट केलेला असावा. हा व्हिडिओ ३० सेकंद ते १ मिनिटाचा असावा. अपलोड करताना ऑफिशियल पेजला टॅग अथवा कोलॅब करावे. या सोबतच ही रिल dreamyard@mangocity. org ला पाठवावी. व्हिडिओ आक्षेपार्ह किंवा कोणाच्या भावना दुखवणारा नसावा. व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख २४ सप्टेंबर दुपारी १२ वाजेपर्यंत राहील. जास्तीत जास्त युवक-युवतींनी कोकणातील पर्यटनस्थळांवर जाऊन रिल तयार करावी तसेच कोकणच्या पर्यटनाला गती मिळण्यासाठी रिल चांगली बनवावी, असे आवाहन रत्नागिरी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:54 PM 16/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow