Vidhan Parishad Election 2024: विधानपरिषद निवडणूक ठाकरे गट, काँग्रेसमध्ये समेट; कोकणातून किशोर जैन तर नाशिकमधून दिलीप पाटलांची माघार

Jun 12, 2024 - 14:21
 0
Vidhan Parishad Election 2024: विधानपरिषद निवडणूक ठाकरे गट, काँग्रेसमध्ये समेट; कोकणातून किशोर जैन तर नाशिकमधून दिलीप पाटलांची माघार

मुंबई : कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघात मविआमधील (Maha Vikas Aghadi) ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये आता समेट झाले आहे. कोकण पदवीधरमधून ठाकरे गटाच्या किशोर जैन यांनी माघार घेतली आहे.

तर नाशिकमध्ये काँग्रेसच्या दिलीप पाटील यांनी माघार घेतली आहे. दिल्लीत वरिष्ठांकडून फोन आल्यानंतर निर्णय झाल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. त्यामुळे आता कोकणातील जागेवर ठाकरे गटानं उमेदवार मागे घेतल्यानंतर भाजपचे निरंजन डावखरे विरुद्ध काँग्रेसचे रमेश कीर यांचा सामना होणार आहे.

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीबाबत मविआतील बिघाडी संपल्यात जमा आहे. याचं कारण म्हणजे काँग्रेस आणि ठाकरे गटातला वाद जवळपास संपुष्टात आला आहे. त्यानुसार, नाना पटोलेंनी मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश सोनावणे यांना फोन करून उमेदवारी अर्जृ मागे घेण्यास सांगितलं आहे. त्यामुळे मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी आता भाजपचे शिवनाथ दराडे ठाकरे गटाचे ज.मो.अभ्यंकर आणि शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्यात तिहेरी लढत होणार आहे.

काँग्रेस आणि ठाकरे गटातला वाद जवळपास संपुष्टात

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीबाबत मविआतील बिघाडी संपल्यात जमा आहे. याचं कारण म्हणजे काँग्रेस आणि ठाकरे गटातला वाद जवळपास संपुष्टात आला आहे. त्यानुसार, नाना पटोलेंनी मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश सोनावणे यांना फोन करून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितलं आहे. त्यामुळे मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी आता भाजपचे शिवनाथ दराडे ठाकरे गटाचे ज.मो.अभ्यंकर आणि शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. तसंच, नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील यांनी देखील माघार घेतली आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक

महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक होणार आहे . या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघाचा समावेश आहे . मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ , तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे . या चारही जागांची मुदत 7 जुलै 2024 ला संपत आहे. मतदानाची तारीख 26 जून आहे. 1 जुलैला मतमोजणी होईल.मात्र या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:44 12-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow