मुंबई – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या निकालात महाराष्ट्रात मुलींनी सरस कामगिरी केली आहे. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.३५ टक्के, तर मुलांचे ९६.१ टक्के आहे.
राज्यातील ९६.६६ टक्के विद्यार्थिनी- विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर मुंबई महापालिकेच्या सीबीएसई शाळांचा निकाल ९२.८० टक्के लागला तर खासगी शाळांची घसरण झाली आहे.
सीबीएसईचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. महाराष्ट्राने ९६.६६ टक्के निकाल नोंदवत नाव उज्ज्वल केले आहे. यंदा देशपातळीवर ९३.७० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मागील वर्षाच्या तुलनेत निकालात किरकोळ वाढ झाली. राज्यात १,४९६ शाळांमध्ये ४४५ केंद्रावर परीक्षा झाली. त्यासाठी १,३३,६६३ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यांपैकी १,३३,३८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. निकालानुसार राज्यात १,२८,९३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूणच, यंदाच्या निकालात विद्यार्थ्यांची कामगिरी समाधानकारक ठरली असून, राज्याचा निकाल ९६.६६ टक्केवारी इतका लागला.
मुंबई पालिकेच्या शाळांचा निकाल ९२.८० टक्के
पालिकेच्या ११ मुंबई पब्लिक स्कूल सीबीएसई शाळांच्या ३३९ विद्यार्थ्यांपैकी ९२.८० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ३५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले. ११ पैकी चार शाळांचा निकाल १०० टक्के राहिला. मुलुंडच्या आर्या लामने ९७.८० टक्क्यांसह प्रथम, अंधेरीच्या सौरभ यादवने ९७.२० टक्क्यांसह द्वितीय, तर घाटकोपरच्या कौस्तुभ त्रिपाठीने ९७ टक्क्यांसह तृतीय क्रमांक पटकावला.
पेकीच्या पैकी टॉप थ्री
सेंट जोसेफ हायस्कूल सीबीएसई, पनवेल
रायन इंटरनॅशनल स्कूल, सानपाडा
रायन इंटरनॅशनल स्कूल, कांदिवली
खासगी शाळांची घसरण : अनुदानित सीबीएसई शाळांनी १०० टक्के निकालासह सर्वोच्च स्थान पटकावले असून नवोदय व केंद्रीय विद्यालयांनीही ९९ टक्क्यांपेक्षा अधिक निकाल नोंदवला. मात्र खासगी सीबीएसई शाळांचा निकाल केवळ ३४.१८ टक्के इतका अत्यंत कमी लागला आहे.
महाराष्ट्रातील यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनी
परिक्षार्थी विद्यार्थिनी : ५७,६११ उत्तीर्ण : ५६०८५ ९७.३५%
परिक्षार्थी विद्यार्थी : ७५,७७१ उत्तीर्ण : ७२,८४८ ९६.६६%
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 16-04-2026














