Breaking: HSC Result 2026: बारावीचा निकाल जाहीर! राज्याचा निकाल ८९.७९ टक्के; कोकणची बाजी, लातूर तळाला!

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आज, २ मे २०२६ रोजी मंडळाने बारावीचा (HSC) निकाल अधिकृतपणे जाहीर केला आहे. यंदाच्या निकालातही मुलींनी आपले वर्चस्व कायम राखले असून, निकालाच्या टक्केवारीत मुलींनी मुलांपेक्षा जास्त प्रगती केली आहे.

परीक्षा आणि निकालाचा आढावा

यंदा बारावीची बोर्ड परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत राज्यभरात अत्यंत सुरळीतपणे पार पडली. एकूण १५३ विषयांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी बोर्डाने विशेष पत्रकार परिषद घेतली आणि राज्याचा एकूण निकाल व सांख्यिकी माहिती सादर केली.

कोकण विभाग अव्वल, तर ‘या’ विभागाचा निकाल सर्वात कमी

राज्यातील नऊ विभागीय मंडळांपैकी दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने बाजी मारली असून हा विभाग निकालात राज्यात अव्वल ठरला आहे. दुसरीकडे, सर्वात कमी निकालाची नोंद लातूर विभागात झाली आहे.

विभागीय कामगिरी थोडक्यात:

  • अव्वल विभाग: कोकण
  • सर्वात कमी निकाल: लातूर विभाग

मुलींचे वर्चस्व कायम

राज्यातील बारावीच्या निकालाची परंपरा यंदाही कायम राहिली आहे. निकालात मुलींचा उत्तीर्ण होण्याचा टक्का मुलांच्या तुलनेत अधिक आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, मुलींनी अभ्यासात आणि निकालात पुन्हा एकदा बाजी मारत आपले यश सिद्ध केले आहे.

HSC 12th Result : यंदा कोकणची बाजी

कोकणचा निकाल यंदा सर्वाधिक- ९४.१४ टक्के लागला आहे. तर लातूर विभागाचा ८४.१४ सर्वात कमी निकाल लागला आहे

Maharashtra 12th Result : राज्याचा निकाल ८९.७९ टक्के

या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर क कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय. टी. आय. या शाखांसाठी एकूण १४,४४,७१३ नियमित विद्याथ्र्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,३३,०५८ विदयार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १२,८६,८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतची टक्केवारी ८९.७९ आहे.

विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘हेल्पलाईन’ आणि समुपदेशक

विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा आणि निकालाचा ताण कमी करण्यासाठी बोर्डाने यंदा विशेष पावले उचलली होती. निकालानंतर कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी:

  • राज्यभरात १० मुख्य समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती.
  • जिल्हानिहाय विशेष समुपदेशक नेमण्यात आले होते.
  • विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी बोर्डाची हेल्पलाईन देखील २४ तास कार्यान्वित होती.

महत्त्वाची टीप: विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी बोर्डाने दिलेल्या मुदतीत अर्ज करणे आवश्यक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 02-05-2026