रत्नागिरी : खेर्डीतील विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळातर्फे कातकरी वाड्यात दिवाळी साजरी

रत्नागिरी : गेली १० वर्षे अविरत सामाजिक सेवा करणाऱ्या चिपळूणजवळच्या खेर्डीतील विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळाने सलग ११ व्या वर्षी निरबाडे येथील कातकर वाड्यात दिवाळी साजरी केली.

मंडळाचे मार्गदर्शक दशरथ शेठ दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षीप्रमाणे आदिवासी लोकांची दिवाळीदेखील आनंदात साजरी व्हावी, या उदात्त हेतूने पाड्यावर जाऊन त्यांना दिवाळीचा फराळ,कपडे व इतर गृहोपयोगी वस्तूंचे वाटप काल आज करण्यात आले. अत्यंत आनंदाच्या वातावरणात वाटपाचा कार्यक्रम पार पडला. आपल्याबरोबर सर्वसामान्य लोकांनीसुद्धा दिवाळी साजरी केली पाहिजे, या भावनेने गेली १० वर्षे गणेश मित्र मंडळ काम करीत आहे. खेड तालुक्यातील निरबाडे येथील कातकरी पाड्यावर जाऊन तेथील सुमारे ८० घरातील लोकांना सर्व प्रकारची अत्यावश्यक मदत आणि दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमासाठी मंडळाचे आधारस्तंभ दशरथ दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष शशांक भिंगारे, उपाध्यक्ष राकेश प्रजापती, सेक्रेटरी महेश पवार, सल्लागार विकास ढवण सर,मंडळाचे माजी अध्यक्ष प्रशांत दाभोळकर, यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी आणि अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 02-11-2024