SSC Board Exams 2026: महाराष्ट्र बोर्डाच्या 179 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण; जाणून घ्या यंदाच्या दहावीच्या निकालाची ठळक वैशिष्ट्ये

SSC Board Exams 2026:महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल (SSC Result 2026) जाहीर करण्यात आला आहे.

यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल 92.9 टक्के लागला आहे. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक (Konkan Division Recorded Highest Result) लागला असून 97.62 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,55,026 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,42,472 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची एकूण उत्त्तीर्णतेची टक्केवारी 92.09 आहे. राज्यातून 6 हजार 612 शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर 4 लाख 82 हजार विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 94 टक्के आहे.

दहावीच्या निकालाची ठळक वैशिष्ट्य काय? (Highlights Of 10th Grade Results)

1. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,55,026 नियमित विद्याथ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,42,472 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 92.09 आहे.

2. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 29,506 खाजगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 28,825 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी 22,003 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 76.33 आहे.

3. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 29,518 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी 28,867 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी 9757 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 33.79 आहे.

4. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून नियमित, खाजगी व पुनर्परिक्षार्थी मिळून एकूण 16,14,050 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी 16,00,164 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी 14,52,246 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 90.75 आहे.

5. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 10,031 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 9,912 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी 9,042 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 91.22 आहे.

6. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (97.62%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा (88.41%) आहे.

7. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 94.96 असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 89.56 आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 5.40 ने जास्त आहे.

8. माध्यमिक शालान्त (इ.10 वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2026 करीता एकूण 64 विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी एकूण 20 विषयांचा निकाल 100 % टक्के लागला आहे.

SSC Exam Result 2026: विभागनिहाय आकडेवारी समोर

  • कोकण: 97.62 टक्के
  • पुणे: 94.24 टक्के
  • नागपूर: 89.07 टक्के
  • मुंबई: 94.97 टक्के
  • कोल्हापूर: 95.47 टक्के
  • अमरावती: 90.50 टक्के
  • नाशिक: 90.53 टक्के
  • लातूर: 88.42 टक्के
  • छत्रपती संभाजीनगर: 88.41 टक्के

एकूण विद्यार्थ्यांची नोंदणी: 15 लाख 55 हजार 026

उत्तीर्ण विद्यार्थी: 14 लाख 20 हजार 486

दहावीचा निकाल इथे पाहता येणार? (Where Can Check SSC 10th Result 2026)

  • https://sscresult.mahahsscboard.in/
  • https://results.targetpublications.org/
  • https://results.digilocker.gov.in
  • https://mahahsscboard.in
  • https://results.navneet.com

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:51 08-05-2026