Ratnagiri Water Crisis: रत्नागिरी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या सव्वाशे पार; ४२ हजार नागरिकांना १८ टँकरचा आधार

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. कडक उन्हामुळे नदी, विहिरी, तलाव आणि धरणे झपाट्याने आटत चालली असून ग्रामीण भागात पाण्याची दाहकता वाढली आहे. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या आता सव्वाशे पार गेली असून तब्बल ५५ गावांमधील १२१ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई भासत आहे.

या कठीण परिस्थितीत जिल्ह्यातील ४२,६३५ नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी प्रशासनाने १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. मात्र, अद्यापही काही तालुक्यांमध्ये टँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

१८ टँकरच्या माध्यमातून १,६४४ फेऱ्या

जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, सध्या पाणीटंचाईची झळ बसलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी एकूण १८ टँकर मैदानात उतरवण्यात आले आहेत. यामध्ये ३ शासकीय आणि १५ खाजगी टँकरचा समावेश आहे. टंचाईग्रस्त भागात आतापर्यंत तब्बल १ हजार ६४४ टँकरच्या फेऱ्या पूर्ण झाल्या असून, पाणी पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आगामी आठवड्यात तापमान आणखी वाढल्यास टँकरची संख्या वाढवावी लागण्याची दाट शक्यता आहे.

लांजा आणि राजापूर तालुक्यात अजूनही टँकर नाही!

एकीकडे जिल्ह्यातील ७ तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असताना, दुसरीकडे लांजा आणि राजापूर या दोन तालुक्यांमध्ये अद्याप एकही टँकर सुरू झालेला नाही. या दोन्ही तालुक्यांतील ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून विहिरी आटल्या आहेत. असे असूनही प्रशासनाने येथे टँकर सुरू न केल्यामुळे स्थानिक टंचाईग्रस्तांना तीव्र आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

Merchant navy

तालुकानिहाय टँकर आणि टंचाईची सद्यस्थिती:

जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात पाणीटंचाईची काय परिस्थिती आहे, याचा सविस्तर तक्ता खालीलप्रमाणे आहे:

तालुकाबाधित गावेबाधित वाड्यासुरू असलेले टँकर
मंडणगड६६१
दापोली२७१
खेड११२११
गुहागर१११
चिपळूण१०२४१
संगमेश्वर१५३१३

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:25 21-05-2026