रत्नागिरीतील प्रसिद्ध ‘दीपक स्टोअर्स’चे मालक किरण वणजु यांचे निधन

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठेतील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ व्यापारी, ‘दीपक स्टोअर्स’चे मालक किरण दत्तात्रय वणजु यांचे आज वयाच्या ७३ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे रत्नागिरीच्या व्यापारी वर्गात आणि परिचित गोटात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

​किरण वणजु यांचे रत्नागिरीतील मुख्य बाजारपेठेत गोखले नाका येथे ‘दीपक स्टोअर्स’ नावाचे प्रसिद्ध दुकान होते. रत्नागिरीतील जुन्या जाणत्या ग्राहकांसाठी दीपक स्टोअर्स हे हक्काचे आणि विश्वासाचे खरेदीचे ठिकाण म्हणून ओळखले जात असे. आपल्या चोख व्यवसायामुळे आणि अगत्यशील स्वभावामुळे त्यांनी ग्राहकांशी आपुलकीचे संबंध जोडले होते.

​त्यांच्या पश्चात पत्नी, भावंडे असा मोठा परिवार आहे.

​आज दुपारी अंत्ययात्रा

मिळालेल्या माहितीनुसार, दिवंगत किरण वणजु यांची अंत्ययात्रा आज दुपारी ४:०० वाजता जोशी पाळंद येथील त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे.