पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इटली दौरा नुकताच पार पडला. त्यावरून देशातील विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी इटलीचा दौरा अनेक गोष्टी लपवण्याची केल्याचे पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
आंबेडकर म्हणाले, मोदींचा जो दौरा आहे तो स्पॉक्सक्रीन आहे. त्यांचा ठरलेला दौरा हा वेगळा होता. गॅस आणि महागाईची समस्या ही मोदींमुळे मुळे आहे. इस्राईल आणि पॅलिस्टिन मधील भांडणाचा परिणाम म्हणून इटलीत 4 जहाज अडवली आहेत. ज्यामध्ये 800 टन मिलिटरी ग्रेडेड स्टील आहे. त्याचा वापर पॅलिस्टिनला संपवण्यासाठी करणार आहे. त्यांना माहिती आहे की, भारत सरकार इस्रायल बरोबर आहे. संभाजी नगरची मित्तल स्टील नावाची कंपनी आहे जी स्टीलच्या या गोष्टीत सहभागी आहे. इस्राईलला हे माहित झालं की, भारत इस्त्राईल ला मिलिटरी ग्रेनाइट पोचवत आहे. इटलीला हे कळल्यामुळे आपल्या देशात गॅस आणि इतर गोष्टींची टंचाई झाली.
भारताला चीन आणि इतर देश विरोध करत आहे. त्याचे कारण नरेंद्र मोदींची प्रतिमा कारणीभूत आहे. मोदी अडचणीत आले आहेत. त्यामुळे भारताला जे करायचं नाही ते केलं जात आहे. इटलीतील या कंपनीची कमिटी जेल मध्ये आहे. आपल्याकडे यासाठी काही विशेष रुल्स नाहीत. मोदींच्या इटली दौऱ्याचे कारण भारताने पाठवलेले स्टील लपवणे आहे. त्यामुळे जगात विरोध होत आहे. इंटरनॅशनल पातळीवर ह्याची चर्चा आहे. आम्ही म्हणतो ते खरं आहे की, खोट मोदींनी सांगाव. लोकांना प्रश्नांची उत्तरे द्यावी. चार जहाज इटली सरकारने पकडले आहेत. जे इस्रायला चालले होते. या गोष्टी लपविण्यासाठी मोदी इटलीला गेले होते. आणि ज्या कंपनीचे मालक जेलमध्ये आहेत. ही गोष्ट आणि डॉक्युमेंट बाहेर यायला नको म्हणून त्यांनी हा दौरा केला. मेलडी चॉकलेट हे त्यांनी केलेले काम लपविण्यासाठी दिलं आहे. लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड, औरंगाबाद ही कंपनीने स्टील पाठविले आहे. पंतप्रधान मोदींनी हा स्टंट केला आहे. फक्त इतर देशांची नावे पुढे करायची आणि इटलीला जायचं अस केलं आहे. त्या जहाजांची माहिती बाहेर येऊ नये म्हणून हे केलं आहे.
मोदींवर दबाव आहे
भारताला जे एलपीजी आणि क्रूड ऑइल यायला पाहिजे होत. युद्ध सुरू आहे तेंव्हा सगळ मिळालं आता का मिळत नाही? त्याच कारण मोदी आहे. एपिस्टिन फाईल मध्ये नाव आल्याने मोदींच अस सगळ सुरू आहे. चोरून मिलिटरी ग्रेनाइट इस्त्राईलला का पोचवलं जात? भारताला क्रूड ऑइल द्यायला सगळे देश तयार आहेत. हे सगळ मोदींमुळ अडल आहे. मोदींनी न्यूट्रल धोरण बदलून इस्रायल धार्जिणे धोरण आखले आहे. त्यामुळे हे सगळ झालं. देशाच्या हिताचे धोरण बदलले आहे. एपस्टीन रेकॉर्ड अमेरिकेकडे आहे, त्यामुळं मोदींवर दबाव आहे.
त्यांनी तरुणांची माफी मागावी
कॉकरोच जनता पार्टी प्रकरणाबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले, तरुणांचा उद्रेक बाहेर पडला असून आता तो दिसतोय. CJI ने युवकांची माफी मागितली पाहिजे. कारण तरुणांना असं झुरळ बोलू नये. त्यांनी खुलासा करावा. माफी मागितल्याने त्यांची किंमत कमी होणार नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 22-05-2026














