Chhagan Bhujbal: राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नाही, पुरेसा साठा उपलब्ध – मंत्री छगन भुजबळ

Chhagan Bhujbal मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पेट्रोल-डिझेलच्या (Petrol- Diesel) दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात इंधनटंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत.

मात्र, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा (Petrol- Diesel Shortage) पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले की, राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नाही. त्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल-डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचे निदर्शनास आले असून, त्यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे २० टक्के अधिक पेट्रोल-डिझेलची विक्री झाल्याची माहिती त्यांनी दिली.

Chhagan Bhujbal : नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे

‘देशाचे पंतप्रधान, केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रत्येक नागरिकाला पुरेशा प्रमाणात इंधन उपलब्ध करून देण्यास सक्षम आहेत. त्यामुळे अफवा किंवा भीतीच्या वातावरणामुळे अतिरिक्त साठा करण्याची आवश्यकता नाही,’ असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले. यावेळी त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील गेल्या काही दिवसांतील इंधन विक्रीची आकडेवारीही माध्यमांसमोर मांडली. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

बुलढाण्यात पेट्रोल – डिझेलसाठी निघाल्यात तलवार आणि कोयता; खामगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल.

बुलढाणा जिल्ह्यात इंधन टंचाईच भीषण रूप आता समोर येत आहे. चक्क पेट्रोल आणि डिझेल मिळवण्यासाठी आता तलवार आणि कोयते सुद्धा बाहेर निघाले आहेत. खामगाव-अकोला मार्गावरील पिंप्राळा फाट्यावरील केके रिलायन्स पंपावरील कर्मचाऱ्याला काही वाहनधारकांनी पेट्रोल आम्हाला कॅनमध्ये का देत नाही? या कारणावरून तलवार आणि कोयता घेऊन मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात पेट्रोल पंप कर्मचारी सागर दिलीप आचार हा जखमी झाला असून खामगाव ग्रामीण पोलिसात आरोपी वाहन चालक अमोल जाधव, अक्षय जाधव, चेतन जाधव व अनोळखी एक अशा चौघांवर कलम 4/25 आर्म ऍक्ट, 15(2), 352, 351(2)3(5)BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्यापही फरार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:27 22-05-2026