पुणे: राज्यात अकरावी प्रवेशाच्या केंद्रीय व ऑनलाइन प्रक्रियेत एकूण २० लाख ३० हजार ३३३ जागा उपलब्ध असून, आतापर्यंत केवळ ९ लाख ५४ हजार ८६७ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केलेली आहे. तसेच शून्य फेरीत दि. १८ व १९ मे २०२६ दरम्यान एकूण ३९ हजार ६१३ विद्यार्थ्यांनी कोटातंर्गत (इन-हाऊस, व्यवस्थापन, अल्पसंख्याक) प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित केला आहे. माध्यमिक व उच्च्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी ही माहिती परिपत्रकाद्वारे दिली आहे.
दरम्यान, राज्यात शून्य फेरीसाठी एकूण ९ हजार २६३ कनिष्ठ महाविद्यालय/उच्च माध्यमिक शाळांची नाेंदणी करण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शून्य फेरीमध्ये कोटाअंतर्गत आपला प्रवेश निश्चित केलेल्या आहे, त्यांची नावे पुढील प्रवेश फेऱ्यांमधून वगळण्यात येतील. विद्यार्थी-पालक, तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी शिक्षण विभागाने https://mahafyjcadmissions.in हे अधिकृत पोर्टल आणि support@mahafyjcadmissions.in हा ई-मेल आयडी देण्यात आला आहे. तसेच ८५३०९५५५६४ हा हेल्पलाइन नंबर देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे.
शून्य फेरीमध्ये कोटाअंतर्गत विभागनिहाय झालेले प्रवेश
विभागाचे नाव : इन-हाऊस कोटा : व्यवस्थापन कोटा : अल्पसंख्यांक कोटा : एकूण प्रवेशित विद्यार्थी
पुणे : ५,८२६ : १,११५ : १,५८५ : ८,५२६
मुंबई : २,६९० : १७६ : ४,१८२ : ७०४८
नाशिक : ३,१६६ : ५३८ : २,२९९ : ६,००३
अमरावती : २,१४४ : ५०३ : १,९५८ : ४,६०५
कोल्हापूर : २,७२१ : ८३४ : ६१४ : ४,१६९
छत्रपती संभाजीनगर : १,७१९ : ५२२ : १,७११ : ३,९५२
नागपूर : २,२५५ : ५३७ : ४७७ : ३,२६९
लातूर : १,२१७ : ५१३ : ३११ : २,०४१
एकूण : २१,७३८ : ४,७३८ : १३,१३७ : ३९,६१३
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:27 22-05-2026














