Ratnagiri : आचारसंहितेमुळे जून महिन्याचा लोकशाही दिन रद्द

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने जून २०२६ मधील १ जून रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नाही.

जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो.

जून २०२६ चा लोकशाही दिन सोमवार दि.१ जून रोजी दुपारी १ ते २ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात होणार होता. तथापि, महाराष्ट्र विधान परिषद रायगड तथा रत्नागिरी तथा सिंधुदुर्ग स्थानिक मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम १८ मेपासून घोषित करण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच १८ मेपासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच २५ जूनपर्यंत जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू असल्याने जून २०२६ मधील १ जून रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन होणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कळविले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 28-05-2026