इंजिनिअरिंगसाठी घेतली जाणारी देशातील प्रतिष्ठित प्रवेश पूर्व परीक्षा ‘जेईई अॅडव्हान्स्ड’चा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत आयआयटी दिल्ली झोनच्या शुभम कुमारने ३६० पैकी ३३० गुण मिळवून ‘कॉमन रँक लिस्ट’मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
तर आयआयटी दिल्ली झोनच्याच आरोही देशपांडे ही ७७ व्या ऑल इंडिया रँकसह सर्वात जास्त गुण मिळवणारी विद्यार्थी ठरली आहे.
५६,००० हून अधिक विद्यार्थी पात्र
सोमवारी जाहीर झालेल्या ‘जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन २०२६’ च्या निकालात ५६,००० पेक्षा जास्त उमेदवारांनी यश मिळवले आहे. देशातील अत्यंत कठीण परीक्षांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या प्रवेश परीक्षेत एकूण ५६,८८० उमेदवार उत्तीर्ण झाले, ज्यामध्ये १०,१०७ विद्यार्थींनीचा समावेश आहे. आरोही देशपांडे ७७ व्या ऑल इंडिया रँकसह सर्वात जास्त गुण मिळवले आहेत. तिने ३६० पैकी २८० गुण मिळवले.
१७ मे २०२६ रोजी झालेल्या JEE (Advanced) २०२६ च्या पेपर १ आणि पेपर २ या दोन्ही पेपरला एकूण १,७९,६९४ उमेदवार उपस्थित होते. कबीर छिल्लरने ३२९ गुणांसह दुसरा, तर जतिन चहरने ३१९ गुणांसह तिसरा क्रमांक परीक्षेत पटकावला आहे.
या परीक्षेत राष्ट्रीय पातळीवर पहिला क्रमांक पटकावणारा शुभम कुमार म्हणाला की, “मी गेल्या दोन वर्षांपासून ‘जेईई अॅडव्हान्स्ड’ ची तयारी करत होतो. माझ्या कठोर परिश्रमांमुळे मला चांगली रँक मिळेल अशी आशा मला होती. आता मला ‘ऑल इंडिया रँक १’ मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे”, अशी भावना शुभम याने व्यक्ती केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 01-06-2026














