मेष – आज आपणाला थकवा, आळस व व्यग्रता जाणवेल. उत्साह अजिबात वाटणार नाही.
वृषभ – आज शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. अशा परिस्थितीत नवीन कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील.
मिथुन – आजचा दिवस मनोरंजन व आनंद – प्रमाद करण्याचा आहे.
कर्क – आजचा दिवस आनंददायी व यशदायी आहे. कुटुंबीयांसह आनंदात वेळ जाईल.
सिंह – आज आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. सृजनशीलता विकसित होऊन नवनिर्मिती सुंदर प्रकारे करता येईल.
कन्या – आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. अनेक गोष्टींची काळजी लागून राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल.
तूळ – आज नशिबाची साथ लाभेल. भावंडांशी सौहार्दतेचे संबंध राहतील.
वृश्चिक – आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
धनु – आज शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. नियोजित कामे करु शकाल.
मकर – आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. कामांमध्ये सहकार्यांचा हस्तक्षेप वाढेल.
कुंभ – नवीन कार्य सुरु करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. नोकरी – व्यवसायात फायदा संभवतो.
मीन – आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामे यशस्वीपणे होऊ शकतील.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 02-06-2026














