नाशिक : “मनसे महायुतीमध्ये नाही, त्यांनी काही उमेदवार उभे केले आहेत, भाजप आणि मनसेमध्ये अंडरस्टॅडिंग आहे. मनसेचा युतीला फायदा होणार आहे. मुख्यमंत्री महायुतीचा होणार या राज ठाकरेंच्या मताशी सहमत आहे.
आमच्यात वाद होणार नाही. केंद्रीय नेते आणि आम्ही निर्णय घेऊ. आमच्यामध्ये वाद झाले तर तर मुख्यमंत्री पदासाठी मी तयार आहे”, असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. ते नाशिकमधील पत्रकार परिषदेत बोलत होते.
सर्व मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देणे शक्य नाही
रामदास आठवले म्हणाले, RPI च्या मतांचा उपयोग महायुतीला झाला आहे. हरियाणामध्ये लोकसभेला कमी जागा आल्या. मात्र विधानसभेला जास्त जागा आल्या. आमचा आत्मविश्वास वाढला. ही निवडणूक विकासाच्या मुद्यांवर लढणार आहोत. मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे. जरांगे पाटील यांच्या भूमिकाचे स्वागत करतो. जरांगे फॅक्टर चालणार नाही. मराठा समाजाच्या मागे सरकार उभे आहे. गरीब मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे. पण केंद्राने आर्थिक 10 टक्के आरक्षण दिले आहे. मराठा समाजाला ओबीसीमध्ये टाकण्याची मागणी जरांगे यांची आहे. सर्व मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देणे शक्य नाही. कोणाला ओबीसी म्हणयाचे हा अधिकार केंद्राला आहे.
राजू शेट्टी, संभाजीराजे यांच्या आघाडीचा फायदा आम्हाला होणार आहे
जरांगे पाटील यांच्या भूमिकाचा फायदा आम्हाला होणार आहे. राज ठाकरेंनी आपले उमेदवार उभे केले त्याचा फायदाही आम्हाला होणार आहे. राजू शेट्टी, संभाजीराजे यांच्या आघाडीचा फायदा आम्हाला होणार आहे. आमच्या पक्षाला 4/5 जागा मिळायला पाहिजे होत्या. मात्र 1 जागा दिली. तरीही कार्यकर्त्यांनी बंडखोरच्या मागे उभे राहू नये. केंद्रीय मंत्री, महामंडळ, mlc अशी पद आपल्याकडे आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांनी महायुतीच्या मागे उभ राहावे. नवीन मित्र आलेत म्हणजे भाजपने आम्हाला मागे टाकू नये, असा इशाराही रामदास आठवले यांनी दिला.
पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले, जरांगेची भूमिका योग्य त्यांना आता राजकारण कळू लागले आहे. काही वेळा दोन पावले मागे यावे लागते. मनसे महायुतीमध्ये नाही, त्यांनी काही उमेदवार उभे केले आहेत. भाजप आणि मनसेमध्ये अंडरस्टॅडिंग आहे. मनसेचा युतीला फायदा होणार आहे. मुख्यमंत्री महायुतीचा होणार या राज ठाकरेंच्या मताशी सहमत आहे. आमच्यात वाद होणार नाही. केंद्रीय नेते आणि आम्ही निर्णय घेऊ. कोनात वाद झाले तर मुख्यमंत्री पदासाठी मी तयार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:23 04-11-2024