Raj Thackeray Warning: दिल्लीतील मोर्चा सारखं आमच्या मोर्चात केलं तर ‘फटकवून काढू’; जंतरमंतरवरील आंदोलनावरून राज ठाकरेंचा सज्जड दम

जंतरमंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा इशारा; २६ जुलैच्या मुंबईतील महामोर्च्यात असामाजिक तत्त्वांनी ढवळाढवळ केल्यास महाराष्ट्र सैनिक सोडणार नाहीत

Raj Thackeray Warning: मुंबई :

दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या आडून काही असामाजिक तत्त्वे पोलिसांवर हल्ले करत असून आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. या संपूर्ण परिस्थितीकडे लक्ष वेधले असता, २६ जुलै रोजी मुंबईत निघणाऱ्या संयुक्त मोर्च्यात असा कोणी घुसखोरी किंवा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तर त्याला जागीच फटकवून काढू, असा सज्जड दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

शांततेत मोर्चा, पण दिल्लीसारखा प्रकार खपवून घेणार नाही

मुंबईत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी २६ जुलैच्या महामोर्च्याबाबत मनसेची भूमिका स्पष्ट केली. “२६ तारखेचा आमचा मोर्चा अत्यंत शांततेने होईल. त्यात कोणताही गोंधळ किंवा गैरप्रकार होणार नाही. परंतु, इथे दिल्लीसारखा हिंसक प्रकार करण्याचा किंवा आंदोलनाला वेगळे वळण देण्याचा कोणी प्रयत्न केला, तर आमचे लोक त्यांना अजिबात सोडणार नाहीत,” असा थेट इशारा त्यांनी दिला.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची संयुक्त हाक

नीट (NEET) पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन रविवारी २६ जुलै रोजी मुंबईत भव्य आंदोलनाची घोषणा केली आहे. हा मोर्चा दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क ते प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे. या मोर्च्याची तयारी वेगाने सुरू असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मनसे आणि शिवसेना (उबाठा) कार्यकर्ते सतर्क असणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 23-07-2026