Kurdhe Cyclone Shelter Work: कुर्धेतील कोकण आपत्ती सौमीकरण चक्रीवादळ केंद्राचे रखडलेले काम पुन्हा सुरू

रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे सडा येथे इमारतीचे काम युद्धपातळीवर; पहिल्या स्लॅबसाठी सेंट्रिंगचे काम अंतिम टप्प्यात

Kurdhe Cyclone Shelter Work: रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील पावस जवळील कुर्धे सडा परिसरात प्रस्तावित असलेल्या ‘कोकण आपत्ती सौमीकरण चक्रीवादळ केंद्राच्या’ इमारतीचे थांबलेले काम पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. या इमारतीच्या पहिल्या स्लॅबसाठी सेंट्रिंगचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याने या महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Kurdhe Cyclone Shelter Work: २५ गुंठे जागेवर उभारणी अन् कामाचा प्रवास

कुर्धे येथील कातळ सडा परिसरामध्ये या बहुउद्देशीय चक्रीवादळ केंद्राच्या इमारतीच्या बांधकामासाठी २५ गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात या इमारतीच्या पायाभरणीचे काम अत्यंत जलद गतीने पार पडले होते. मात्र, मुख्य पायाचे (फाउंडेशन) काम पूर्ण झाल्यानंतर काही कारणास्तव हे बांधकाम काही काळासाठी थांबले होते. काम प्रदीर्घ काळ रखडल्यामुळे स्थानिक नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती.

भिंतींचे बांधकाम आणि पहिल्या स्लॅबची तयारी

नागरिकांच्या मागणीनंतर आता या इमारतीच्या भिंतींच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. इमारतीचा पहिला स्लॅब भरण्यासाठी आवश्यक असणारे सेंट्रिंगचे काम सध्या वेगाने सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पहिला स्लॅब पडण्याची शक्यता वर्तवली जात असून या आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या कामाला पुन्हा एकदा वेग आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 06-10-2026

Radhakrushna patapedhi