Nitesh Rane Acquitted: २०१३ च्या धारगळ टोल नाका तोडफोड प्रकरणी मंत्री नितेश राणे यांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

सरकारी पक्ष आरोप सिद्ध करण्यात अपयशी: म्हापसा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा निकाल

सावंतवाडी / म्हापसा: Nitesh Rane Acquitted (नितेश राणे निर्दोष मुक्तता) प्रकरणी महाराष्ट्र राज्याचे बंदरे विकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. २०१३ मध्ये गोव्यातील धारगळ (पेडणे) टोल नाक्यावर झालेली तोडफोड आणि मारहाण प्रकरणात म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल १३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या खटल्याचा अखेर अंत झाला आहे.

नेमकं प्रकरण काय होते? ३ डिसेंबर २०१३ रोजी तत्कालीन ‘स्वाभिमान संघटना’ प्रमुख नितेश राणे आपल्या समर्थकांसह सावंतवाडीहून गोव्यातील कळंगुट येथे एका खाजगी कार्यक्रमासाठी जात होते. धारगळ टोल नाक्यावर पोहोचल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी नियमानुसार प्रवेश शुल्काची मागणी केली. यावरून दोन्ही बाजूंत वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. टोल कर्मचाऱ्यांना मारहाण आणि टोल बूथची तोडफोड केल्याचा आरोप करत पेडणे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.

सरकारी पक्ष पुरावे सिद्ध करण्यात अपयशी या प्रकरणी पेडणे पोलिसांनी नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांसह एकूण ९ जणांविरोधात म्हापसा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. खटल्यादरम्यान नितेश राणे काही वेळा न्यायालयात गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंटही जारी झाले होते. मात्र, अंतिम सुनावणीत सरकारी पक्ष आरोप सिद्ध करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याने न्यायालयाने सर्व उपलब्ध पुरावे व युक्तिवाद विचारात घेऊन नितेश राणे व इतर सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 24-07-2026