जाणून घ्या आज तुमच्या राशीत काय लिहिले आहे
मुंबई : आजचे राशीभविष्य (२९ जुलै २०२६) नुसार आजचा दिवस अत्यंत विशेष आहे. आज बुधवार असून हा दिवस विघ्नहर्षा गणपतीला समर्पित मानला जातो. यासोबतच आज गुरुपौर्णिमेचा पावन सण असल्याने ग्रहांच्या हालचालींच्या दृष्टीने सर्व राशींवर याचा विशेष प्रभाव पाहायला मिळणार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार सर्व १२ राशींसाठी आजचा दिवस कसा राहील, याचा सविस्तर आढावा खालीलप्रमाणे आहे.
मेष ते कर्क : काळजी आणि संयम बाळगण्याचा दिवस
- मेष : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा चिंतेचा राहू शकतो. प्रवास करताना अडचणी येण्याची शक्यता असून उत्पन्नात चढ-उतार दिसून येतील. मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्या.
- वृषभ : व्यवसायात चढ-उतार असले तरी कोर्ट-कचेरीतील जुने वाद मिटतील. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. लाल वस्तूचे दान केल्यास मार्गातील अडथळे दूर होतील.
- मिथुन : मिथुन राशीसाठी दिवस सामान्य आहे. प्रवासात काळजी घ्या. अपुऱ्या झोपेमुळे चिडचिड होऊ शकते. धार्मिक कार्यात सहभागी होताना विशेष विधी पाळावी लागेल.
- कर्क : दिवसाची सुरुवात थोडी नकारात्मक होऊ शकते. मनाविरुद्ध कामांमुळे निराशा येईल, मात्र व्यवसाय सुरळीत चालेल. आज निळ्या वस्तूचे दान करणे फायदेशीर ठरेल.
सिंह ते वृश्चिक : आरोग्य आणि कामातील सतर्कता आवश्यक
- सिंह : आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. जुन्या आठवणी ताज्या झाल्याने मन थोडे उदास होऊ शकते. नोकरदारांसाठी दिवस मध्यम राहील.
- कन्या : कन्या राशीच्या लोकांनी आज सतर्क राहावे. शत्रूंपासून सावध राहून आपल्या कामाशी प्रामाणिक राहा. निष्काळजीपणा टाळा, प्रेम जीवन सामान्य राहील.
- तूळ : व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस उत्तम आहे. कामाच्या ठिकाणी नवीन ऑर्डर्स मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आरोग्याची काळजी घेणे मात्र गरजेचे आहे.
- वृश्चिक : आज घरगुती कामात व्यस्तता राहील आणि घरातील वातावरण प्रसन्न असेल. भविष्याची चिंता वाटत असल्यास नकारात्मक विचार दूर करण्यासाठी योग-साधना करा.
धनु ते मीन : आर्थिक व्यवहार आणि नवीन संधींचा योग
- धनु : देवी लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक स्थिती भक्कम राहील. मुलांकडून शुभवार्ता मिळेल. मात्र नाक, कान, घशाशी संबंधित आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवू शकतात.
- मकर : ग्रहांची स्थिती अनुकूल नसल्याने आज धनहानीचे संकेत आहेत. पैशांचे मोठे व्यवहार किंवा नवीन गुंतवणूक आज टाळणेच हिताचे ठरेल.
- कुंभ : व्यवसायाचा विस्तार होईल, परंतु मनासारखा नफा मिळण्यास वेळ लागेल. आज कोणतीही नवीन महत्त्वाची कामे हाती घेऊ नका. हिरव्या वस्तूचे दान करणे शुभ ठरेल.
- मीन : मीन राशीसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील, तसेच नवीन गोष्टी शिकण्याची आणि प्रवासाची संधी मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी रत्नागिरी खबरदार केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून रत्नागिरी खबरदार कोणताही दावा करत नाही.)
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 29-07-2026














