Karla Property Case : कोर्टाने सील केलेल्या घराचे कुलूप तोडून बेकायदा प्रवेश; रत्नागिरीत गुन्हा दाखल

कर्ला येथील न्यायालयीन ताब्यातील मालमत्तेत कुटुंबासह वास्तव्यास असल्याचा आरोप; रत्नागिरी शहर पोलिसांत गुन्हा

रत्नागिरी : Property Trespass प्रकरणात रत्नागिरी तालुक्यातील जुवे ग्रामपंचायत, कर्ला येथील न्यायालयीन प्रक्रियेनंतर सील करून ताब्यात देण्यात आलेल्या मालमत्तेचे कुलूप तोडून बेकायदा प्रवेश केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्ट कमिशनर यांनी सील करून फिर्यादीच्या ताब्यात दिलेल्या घरात आरोपीने कुटुंबासह वास्तव्यास गेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

कोर्ट कमिशनरने मालमत्ता दिली होती ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजीवकुमार श्रीबिश्वेश्वर प्रसाद (वय ५१) हे बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिसर क्वार्टर्स, शिवाजीनगर, रत्नागिरी येथे वास्तव्यास असून त्यांचे मूळ गाव गिरीडीह (झारखंड) आहे. संबंधित मालमत्ता सर्व्हे क्रमांक १०अ, हिस्सा क्रमांक ११, १२, १३ आणि २० तसेच कर्ला ग्रामपंचायत घर क्रमांक ८३० अशी आहे. ही मालमत्ता कोर्ट कमिशनर यांनी सील करून फिर्यादी यांच्या ताब्यात दिली होती.

सील केलेले कुलूप तोडल्याचा आरोप

तक्रारीनुसार, १ जुलै २०२६ रोजी दुपारी १.३० ते २ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.३० या कालावधीत आरोपी दिगंबर शंकर किर यांनी सील केलेले कुलूप तोडून घरात बेकायदा प्रवेश केला. त्यानंतर आरोपी आपल्या कुटुंबासह त्या घरात वास्तव्यास असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

Tata altroz

रत्नागिरी शहर पोलिसांत गुन्हा नोंद

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५९/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ मधील कलम ३२९(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.