Ratnagiri: श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमावर राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व आणि रील्स स्पर्धा; १५ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

विजेत्यांना रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र

रत्नागिरी:

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याचा विस्तार, संरक्षण आणि हिंदवी साम्राज्याचा झेंडा उत्तरेपर्यंत दिमाखात फडकविणारे अद्वितीय पराक्रमी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अतुलनीय शौर्य, युद्धनीती आणि नेतृत्वाची ओळख नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या ‘अमृत’ (AMRUT) संस्थेतर्फे राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व आणि रील्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धा शालेय गट, महाविद्यालयीन गट आणि खुल्या गटात आयोजित केल्या जाणार असून, प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत आहे.

बक्षिसांचे स्वरूप

प्रत्येक स्पर्धेतील तिन्ही गटांसाठी खालीलप्रमाणे पारितोषिके दिली जातील:

  • प्रथम क्रमांक: ₹५,००० + सन्मानचिन्ह
  • द्वितीय क्रमांक: ₹४,००० + सन्मानचिन्ह
  • तृतीय क्रमांक: ₹३,००० + सन्मानचिन्ह
  • उत्तेजनार्थ: १० स्पर्धकांना विशेष बक्षिसे
  • सहभाग: सर्व सहभागी स्पर्धकांना अधिकृत सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.

स्पर्धेचे ८ प्रमुख विषय:

  1. १८ व्या शतकातील हिंदवी साम्राज्य विस्तारक थोरले बाजीराव पेशवे
  2. अपराजित योद्धा थोरले बाजीराव पेशवे
  3. थोरल्या बाजीरावांचे संघटन कौशल्य
  4. थोरल्या बाजीरावांची युद्धनीती
  5. थोरल्या बाजीरावांची स्वामीनिष्ठा
  6. थोरल्या बाजीरावांची दिल्ली मोहीम
  7. बुंदेलखंड व छत्रसालाचे रक्षणकर्ते थोरले बाजीराव पेशवे
  8. थोरल्या बाजीरावांचा जगप्रसिद्ध पालखेड विजय

स्पर्धांचे नियम आणि तांत्रिक अटी:

  • १. निबंध स्पर्धा (शालेय, महाविद्यालयीन व खुला गट):
    • शब्दमर्यादा: कमाल १००० शब्द. मराठी, हिंदी किंवा इंग्रजीत टाईप करून पीडीएफ (PDF) फाईल स्वतःच्या गूगल ड्राईव्हवर अपलोड करून तिची लिंक वेबसाईटवर सबमिट करावी.
    • संदर्भ: ‘अमृत पराक्रम दिन’च्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती आणि संदर्भ पुस्तकांवरच आधारित असावेत.
  • २. वक्तृत्व स्पर्धा (शालेय, महाविद्यालयीन व खुला गट):
    • कालावधी: जास्तीत जास्त ७ मिनिटे.
    • नियम: व्हिडीओ स्पष्ट, मूळ आवाजात असावा. त्यात कोणतेही ए.आय. (AI) इमेजेस, व्हिज्युअल इफेक्ट्स किंवा साऊंड इफेक्ट्स वापरू नयेत. ड्राईव्ह लिंक वेबसाईटवर सादर करावी.
  • ३. रील्स/शॉर्ट्स स्पर्धा (महाविद्यालयीन व खुला गट):
    • कालावधी: २ ते ३ मिनिटे.
    • नियम: रील्स स्वतःच्या आवाजात व स्वतःवर शूट केलेली असावी. विषयानुसार आवश्यक असल्यास एआय, इमेजेस किंवा साऊंड मिक्सिंग वापरण्यास मुभा आहे.

नोंदणी आणि संपर्क माहिती:

स्पर्धकांनी आपली नोंदणी आणि ड्राईव्ह लिंक्स parakramdin.mahaamrut.org.in या अधिकृत संकेतस्थळावर १५ ऑगस्टपर्यंत सादर कराव्यात.

  • कार्यालयीन पत्ता: विभागीय व जिल्हा कार्यालय ‘अमृत’, साळवी स्टॉप, हॉटेल सिंधुदुर्ग समोर, रत्नागिरी – ४१५६१२
  • संपर्क क्रमांक: ९११२२२८७६१ / ८०८७२७६५१५ / ८२७५२६०२८५

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:17 07-08-2026