पक्षाची बांधणी अन् संघटना बळकट करण्यासाठी मार्गदर्शन; चिपळुणातील शिक्षक पतपेढी हॉलमध्ये होणार मेळावा
चिपळूण: Ramdas Athawale Chiplun Visit (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा मेळावा): रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता चिपळूण येथील शिक्षक पतपेढी हॉलमध्ये जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या मेळाव्यास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा ‘आरपीआय’ (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
पक्षबांधणी व संघटना बळकट करण्यावर भर
या मेळाव्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे कार्यकर्त्यांना पक्षाची बांधणी करणे, जिल्ह्यातील प्रत्येक गावात पक्षाची संघटना अधिक बळकट करणे आणि पक्षाचा जनाधार वाढवणे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या जिल्हास्तरीय मेळाव्यास पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने:
- राष्ट्रीय सरचिटणीस: अविनाश महातेकर
- प्रदेशाध्यक्ष: राजाभाऊ सरवदे
- प्रदेश सरचिटणीस: गौतम सोनावणे
- कोकण प्रदेशाध्यक्ष: प्रकाश मोरे
- कोकण प्रदेश युवक अध्यक्ष: सुशांत सकपाळ
- मुंबई प्रदेशाध्यक्ष: सिद्धार्थ कासारे
- महाराष्ट्र राज्य सदस्य: दादासाहेब मर्चंडे
- मुंबई प्रदेश सरचिटणीस: विवेक पवार
- मुंबई युवक अध्यक्ष: सचिन मोहिते
- कोकण प्रदेश उपाध्यक्ष: प्रा. डॉ. उमेश पवार
- रत्नागिरी जिल्हा युवक अध्यक्ष: ॲड. प्रषितोष कदम
- रत्नागिरी जिल्हा पर्यावरण अध्यक्ष: ॲड. सुरेंद्र तांबे
यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:49 08-08-2026














