Ratnagiri Zilla Parishad Adarsh Shikshak Puraskar: आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी २६ शिक्षकांच्या मुलाखती; जि. प.तर्फे ९ शिक्षकांचा होणार सन्मान

५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण; शासनाच्या मंजुरीनंतर जाहीर होणार यादी

रत्नागिरी जिल्हा परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी मुलाखतीची प्रक्रिया सुरू झाली असून, जिल्ह्यातील २६ शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. प्रत्येक तालुक्यातून तीन प्रस्ताव याप्रमाणे एकूण २७ प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले होते, त्यापैकी २६ शिक्षक मुलाखतीस उपस्थित राहिले.

शैक्षणिक आणि नावीन्यपूर्ण कामांचा घेतला आढावा

मुलाखतीदरम्यान शिक्षकांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय काम, नावीन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेले प्रयत्न तसेच शाळा आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाची माहिती निवड समितीसमोर सादर केली. समिती सदस्यांनी प्रत्येक शिक्षकाच्या कामाचे सखोल मूल्यांकन केले आहे.

Happy journey marathi

समिती सदस्यांची उपस्थिती

या मुलाखतींवेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपाध्यक्ष विलास चाळके, शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीषा कदम आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाने उपस्थित होते.

अंतिम मंजुरीनंतर नावे होणार जाहीर

मुलाखतीनंतर पात्र ठरलेल्या ९ शिक्षकांची अंतिम यादी तयार करून ती मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवली जाईल. शासनाची मंजुरी मिळताच निवड झालेल्या ९ शिक्षकांची नावे जाहीर केली जाणार असू

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:20 25-08-2026