Aaditya Thackeray Lote MIDC: आदित्य ठाकरे आज लोटे एमआयडीसीची पाहणी करणार!

उद्योजकांच्या समस्या जाणून घेणार

चिपळूण:

Aaditya Thackeray Lote MIDC दौऱ्यावर आले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवा सेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे हे बुधवार, २६ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीची पाहणी करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते सायं. ४:३० वाजता लोटे औद्योगिक वसाहतीची प्रत्यक्ष पाहणी करतील.

लोटे येथील उद्योग भवन येथे आमदार आदित्य ठाकरे हे स्थानिक उद्योजकांशी थेट संवाद साधणार आहेत. या बैठकीत उद्योजकांच्या विविध अडचणी, प्रलंबित प्रश्न तसेच त्यांच्या विविध मागण्यांची माहिती ते प्रत्यक्ष जाणून घेणार आहेत. या महत्त्वाच्या संवादानंतर उद्योग भवन येथेच आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न आणि उद्योजकांच्या समस्यांवर मुख्यत्वे चर्चा घडणार आहे. या संपूर्ण पाहणी व बैठकीच्या वेळी गुहागर-खेडचे आमदार व शिवसेना नेते भास्कर जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, युवा सेनेचे पदाधिकारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:41 26-08-2026