श्रावण मासातील शेवटचा शुक्रवार आणि रक्षाबंधनानिमित्त लक्ष्मीदेवीच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार भाग्याची साथ
आजचे राशीभविष्य २८ ऑगस्ट २०२६ वैदिक पंचांगानुसार अत्यंत महत्त्वाचे आणि विशेष मानले जात आहे. आज श्रावण मासातील शुक्रवार तसेच भावा-बहिणीच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणजेच रक्षाबंधन आहे. आजचा दिवस धनलक्ष्मीला समर्पित असून ग्रहांच्या दुर्लभ योगामुळे सर्व १२ राशींच्या जातकांवर याचा शुभ-अशुभ प्रभाव पाहायला मिळणार आहे.
मेष ते मिथुन राशींचे आजचे भविष्य
- मेष रास (Aries): आजचा दिवस बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांसाठी प्रगतीच्या नवीन संधी घेऊन येईल. महिला वर्ग प्रत्येक काम अत्यंत मनापासून आणि निष्ठेने पूर्ण करेल.
- वृषभ रास (Taurus): स्वभावात थोडा बेपरवाहीपणा दिसून येईल. मात्र, नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील व प्रकृती उत्तम राहील.
- मिथुन रास (Gemini): आज तुम्ही प्रत्येक क्षेत्रात स्वतःची धडाडी दाखवाल. आपल्या कौशल्याच्या जोरावर लोकांना स्वतःच्या मताप्रमाणे वागवून घेण्यात यश मिळवाल.
कर्क ते कन्या राशींचे आजचे भविष्य
- कर्क रास (Cancer): कोणत्या वेळी काय निर्णय घ्यावा याची योग्य जाण राहील. योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी बोलल्यामुळे प्रलंबित कामे लवकर मार्गी लागतील.
- सिंह रास (Leo): चुका झाल्या तरी त्या दुरुस्त करता येतात हे सकारात्मकतेने लक्षात ठेवा. तुमच्यातील सुप्त गुणांना सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड दिल्यास मोठे यश संपादन कराल.
- कन्या रास (Virgo): जिद्दीने आणि मेहनतीने काम करण्याची तुमची सवय कायम राहील, मात्र कामाच्या व्यापा मुळे विश्रांती मिळणार नाही. महिलांनी आज वाद किंवा संघर्ष टाळणे हिताचे ठरेल.
आजचे राशीभविष्य २८ ऑगस्ट २०२६: तूळ ते धनु राशींचे भविष्य
- तूळ रास (Libra): आर्थिक नियोजनात आज तुमचे कौशल्य दिसून येईल आणि आर्थिक बाजू मजबूत राहील. दूरच्या प्रवासाचे योग निर्माण होत आहेत.
- वृश्चिक रास (Scorpio): आज इतरांशी संबंध जपताना सावधगिरी बाळगा. ज्यांचे परदेशाशी संबंधित व्यवहार आहेत, त्यांना तेथून अत्यंत सकारात्मक आणि लाभदायक संकेत मिळतील.
- धनु रास (Sagittarius): कलाकार आणि खेळाडूंसाठी आजचा दिवस प्रसिद्धीच्या झोतात आणणारा ठरेल. कौटुंबिक पातळीवर पूर्वी ठरलेला एखादा मंगल सोहळा आनंदाने पार पडेल.
मकर ते मीन राशींचे आजचे भविष्य
- मकर रास (Capricorn): व्यवसायातील दैनंदिन कामे सुरळीत चालतील आणि आलेले तांत्रिक अडथळे दूर होतील. महिलांना अचानक आलेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य करावा लागेल.
- कुंभ रास (Aquarius): सतत बदलणाऱ्या मूडमुळे आसपासचे वातावरण काहीसे प्रभावित होऊ शकते. मात्र, नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने परदेश प्रवासाची संधी चालून येईल.
- मीन रास (Pisces): प्रकृतीच्या जुन्या तक्रारी कमी झाल्याने आरोग्यात सुधारणा होईल. बऱ्याच दिवसांनंतर मनात एक वेगळाच उत्साह आणि ताजेतवाने वातावरण राहील.
(टीप : वरील सर्व बाबी रत्नागिरी खबरदार केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून रत्नागिरी खबरदार कोणताही दावा करत नाही.)
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:21 28-08-2026














