Gogate Joglekar College Phoenix Competition: गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ‘फिनिक्स सॉफ्टवेअर स्पर्धा २०२६-२७’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे संशोधन व तांत्रिक कौशल्य सादर

संगणकशास्त्र विभागाचा उपक्रम; ‘सायबर सुरक्षा’, ‘स्मार्ट फार्मिंग’ अन् ‘एआय’वर आधारित प्रकल्पांनी पटकावले पुरस्कार

रत्नागिरी:- येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) च्या संगणकशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित ‘फिनिक्स सॉफ्टवेअर स्पर्धा २०२६-२७’ मध्ये विद्यार्थ्यांनी विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि संशोधनाच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), वस्तूंचे आंतरजाल (IoT), संगणकीय सुरक्षितता (Cyber Security), मोबाईल ॲप्लिकेशन आणि संशोधन लेखन अशा विविध क्षेत्रांतील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला या स्पर्धेत हक्काचे व्यासपीठ मिळाले.

विविध विभागांतील विजेते प्रकल्प:

  • प्रथम वर्ष (व्हिडिओ फिनिक्स स्पर्धा):
    • प्रथम: सारा मुकादम व रुकया फणसोपकर (‘फिशिंग हल्ला’ प्रकल्प)
    • द्वितीय: सुमया मुकादम व मिफारा मुकादम (‘प्रकाशाधारित माहिती प्रसारण’)
    • तृतीय: सिद्धी पावसकर व कस्तुरी पवार (‘कृत्रिम बुद्धिमत्ता संगणक प्रोग्रामरची जागा घेऊ शकते का?’)
  • द्वितीय वर्ष (कोड फिनिक्स संगणकीय प्रणाली विकास):
    • प्रथम: फरिहा म्हसकर (‘सायबर संरक्षक’ प्रकल्प)
    • द्वितीय: ओम विश्वनाथ बाईत व चिनार विजय मयेकर (‘गुप्तलेख सुरक्षित भांडार’)
    • तृतीय: अमृता महादेव देवळे व लावण्या चंद्रशेखर वाळकर (‘रुग्णालय व्यवस्थापन प्रणाली’)
  • तृतीय वर्ष (डेव्ह फिनिक्स वैयक्तिक ॲप व संकेतस्थळ विकास):
    • प्रथम: वरद मंगेश सरदेसाई (‘खगोलशास्त्रज्ञाची दिनदर्शिका’)
    • द्वितीय: यश सूर्यकांत पकये (‘मृदासंशोधन प्रयोगशाळा व्यवस्थापन प्रणाली’)
    • तृतीय (उत्तेजनार्थ/संयुक्त): रसिक अनंत लिंगायत (‘क्यूआर संकेताधारित संशोधन लेख सादरीकरण प्रणाली’) आणि श्रेया बंडबे (‘समुद्रप्रवाशांच्या वैद्यकीय तपासणी व प्रमाणपत्र व्यवस्थापन प्रणाली’)
  • एम.एस्सी. भाग-१ (रिसर्च रायटिंग फिनिक्स):
    • प्रथम: वेदांत महेश तेंडुलकर व राज विनायक खानविलकर (‘स्मार्ट फार्मिंग ३६० : हवामान अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व आयओटी आधारित प्रणाली’)
  • एम.एस्सी. भाग-२ (रिसर्च फिनिक्स संशोधन स्पर्धा):
    • प्रथम: वैष्णवी गुरव (‘मानसिक ताणाचे लवकर निदान करणारी बहुमाध्यम भावनाओळख प्रणाली’)
    • द्वितीय: उमैमा हमदरे (‘दृष्टी व शारीरिक अडचणी असलेल्या व्यक्तींसाठी एआय आधारित आवाज नियंत्रित सहाय्यक प्रणाली’)
    • तृतीय: सारा माजगावकर (‘स्मार्ट जलव्यवस्थापनासाठी आयओटी व मशिन लर्निंग आधारित अभ्यास’)

गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन

स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात परीक्षक कौस्तुभ भागवत यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. अमोल सहस्रबुद्धे, माहिती तंत्रज्ञान समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे आणि सर्व प्राध्यापक वर्गाने विजेत्यांचे अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 01-09-2026