निळवळी ते जयगड रोडवर कळझोंडी फाट्याजवळील घटना; चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात
रत्नागिरी:
जयगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत निळवळी ते जयगड रोडवर मौजे कळझोंडी (ता. जि. रत्नागिरी) येथे ३० ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास एका बल्कर ट्रकचा अपघात घडला. याप्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वळणावर नियंत्रण सुटल्याने अपघात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी राजू भाऊराव फड (वय ३७ वर्ष, रा. कीर्तीपूर उसवाड, ता. मंठा, जि. जालना) हा त्याच्या ताब्यातील बल्कर ट्रक (क्रमांक MH 46 BU 7101) घेऊन निळवळी ते जयगड रस्त्यावरून जात होता. दरम्यान, कळझोंडी फाटा क्र. २ येथील वळणावर रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता त्याने वाहन हलगर्जीपणे व निष्काळजीपणे चालवले.
त्यामुळे ट्रक रस्त्याच्या उजव्या बाजूस विरुद्ध दिशेला गेला आणि त्याची पुढील दोन्ही चाके रस्त्याच्या साईडपट्टीवरून खाली उतरली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहन चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 01-09-2026














