सुरक्षेच्या कारणास्तव रत्नागिरीतील मूळ घरी पोलीस बंदोबस्त तैनात
रत्नागिरी:
Vidyanand Bapat Attack Case अंतर्गत ‘डीजेमुक्त गणेशोत्सव’ व्हावा यासाठी कायदेशीर व घटनात्मक मार्गाने आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर पुण्यात झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद त्यांच्या मूळ गावी उमटत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथील बापट यांच्या मूळ घरी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार २४ तास कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
रत्नागिरी पोलिसांकडून तातडीने सुरक्षा यंत्रणा सक्रिय
Vidyanand Bapat Attack Case आणि पोलीस प्रशासनाची पावले
पुण्यातील मारहाणीच्या घटनेनंतर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने तातडीने सूत्रे हलवली. गुरुवारी पोलिसांनी गोळप येथील घरी जाऊन बापट यांच्या पालकांची विचारपूस केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शुक्रवारी दुपारपासून त्यांच्या घराबाहेर दोन पोलीस कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले असून, बापट यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी २४ तास ही पोलीस गस्त आणि बंदोबस्त कायम राहणार आहे. गोळप परिसरात सध्या कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कडक नजर ठेवली जात आहे.
विद्यानंद बापट यांच्या पालकांची खंबीर भूमिका
विद्यानंद बापट यांच्या आई कल्पना बापट आणि वडील सुहास बापट यांनी या प्रकरणावर अतिशय खंबीर आणि रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. “डीजेच्या जीवघेण्या दणदणाटाविरोधात आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात आमच्या मुलाने उठवलेला आवाज पूर्णपणे योग्य असून, तो संविधानिक आणि कायदेशीर मार्गाने लढा देत आहे,” असे त्यांनी नमूद केले. झालेली मारहाण दुर्दैवी व निंदनीय असून, संपूर्ण कुटुंब त्याच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाकडे त्याला त्वरित पूर्ण पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 05-09-2026














