ग्रहांचे संक्रमण आणि शुभ राजयोगांमुळे आजचा दिवस ठरणार खास; ‘या’ राशींना धनलाभाची शक्यता
Horoscope Today 10 September 2026 नुसार आज १० सप्टेंबर २०२६ रोजी गुरुवारी दत्तगुरुंच्या आशीर्वादाने अनेक राशींसाठी सकारात्मक बदल घडणार आहेत. ग्रहांच्या महत्त्वाच्या हालचाली आणि राजयोगांमुळे आज सर्व १२ राशींच्या आयुष्यात आर्थिक, व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर वेगवेगळे परिणाम पाहायला मिळतील.
Horoscope Today 10 September 2026 : १२ राशींचे आजचे सविस्तर राशीभविष्य
- मेष रास (Aries): मेष राशीसाठी आजचा दिवस उत्तम असणार असून धनवर्षाव होण्याची शक्यता आहे. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. धार्मिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल आणि मालमत्तेबाबत महत्त्वाचे निर्णय घेता येतील.
- वृषभ रास (Taurus): आर्थिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी ठरेल. नशिबाची पूर्ण साथ लाभेल आणि नवीन प्रोजेक्ट्स हाती येतील. आई-वडिलांचे आशीर्वाद आणि भागीदाराचे सहकार्य यश मिळवून देईल.
- मिथुन रास (Gemini): गेल्या अनेक दिवसांपासून चाललेले मानसिक वादळ आज शांत होईल. व्यवसायात अधिक लक्ष केंद्रित करून काम कराल. परिस्थिती तुमच्या अनुकूल होताना दिसेल.
- कर्क रास (Cancer): आजचा दिवस सामान्य राहील. मोठा नफा किंवा तोटा होणार नाही, मात्र कामात प्रामाणिकपणा ठेवा. विरोधकांपासून सावध राहणे गरजेचे आहे.
- सिंह रास (Leo): आत्मविश्वासाने भरलेला दिवस असेल. वाणीवर संयम ठेवल्यास नात्यांमधील कटुता टळेल. कामाच्या ठिकाणी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून पुढे जा.
- कन्या रास (Virgo): आज सावधानता बाळगणे आवश्यक आहे. भूतकाळातील घटनांचा प्रभाव पडू शकतो. जुन्या चुका वेळेत मान्य करा आणि आज नवीन कामाची सुरुवात करणे टाळा.
- तूळ रास (Libra): कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कामाच्या निमित्ताने प्रवास घडेल आणि मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल. मेहनत फळास येऊन शुभ बातमी मिळण्याची शक्यता आहे.
- वृश्चिक रास (Scorpio): धैर्य आणि संयम बाळगण्याचा हा दिवस आहे. मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्यता असल्याने महत्त्वाचे किंवा धोकेदायक निर्णय आज टाळावेत.
- धनु रास (Saggitarius): कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याची व वेळेवर झोपेची काळजी घ्या. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याचे संकेत आहेत.
- मकर रास (Capricorn): दिवस मिश्र स्वरूपाचा राहील. कामातील चिंता मन अस्वस्थ करू शकते. शेअर बाजारात गुंतवणूक करताना खबरदारी बाळगणे हितकारक ठरेल.
- कुंभ रास (Aquarius): प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. नोकरदारांना पदोन्नती किंवा परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. सरकारी योजनांची कामे मार्गी लागतील.
- मीन रास (Pisces): उत्साही दिवस असेल. रखडलेली कामे मित्रांच्या मदतीने पूर्ण होतील. संध्याकाळी धार्मिक कार्यात सहभाग घेण्याची संधी मिळेल आणि आर्थिक लाभ होईल.
(टीप : वरील सर्व बाबी रत्नागिरी खबरदार केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून रत्नागिरी खबरदार कोणताही दावा करत नाही.)
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 10-09-2026














