Censor Board New Guidelines: सेन्सॉर बोर्डाच्या नियमांत ३५ वर्षांनंतर ऐतिहासिक बदल; चित्रपटांमधील ड्रग्सच्या दृश्यांसाठी नवी वॉर्निंग अनिवार्य

Censor Board New Guidelines: सेन्सॉर बोर्डाच्या नियमांत ३५ वर्षांनंतर ऐतिहासिक बदल; चित्रपटांमधील ड्रग्सच्या दृश्यांसाठी नवी वॉर्निंग अनिवार्य

CBFC कडून ‘UA’ श्रेणीत ३ नवीन एज मार्कर्स लागू; १८ सदस्यांच्या नव्या बोर्डात प्रसिद्ध अभिनेत्यांचा समावेश

Gim trainer

मुंबई:

केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (CBFC) तब्बल ३५ वर्षांनंतर आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये मोठे आणि महत्त्वाचे बदल केले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार, १९९१ नंतर प्रथमच सेन्सॉर बोर्डाच्या नियमावलीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या नव्या नियमांनुसार, चित्रपटांमध्ये नार्कोटिक्स ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक पदार्थांशी संबंधित दृश्ये दाखवताना प्रेक्षकांसाठी अनिवार्य चेतावणी (इशारा) देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय, वयोमर्यादेनुसार चित्रपट वर्गीकरणासाठी नवीन ‘एज मार्कर्स’ (Age Markers) जाहीर करण्यात आले आहेत.

Rotery school

ड्रग्सच्या दृश्यांसोबत आता आरोग्य व कायदेशीर इशारा

JMBR ACADEMY – ADMISSIONS OPEN!

यापूर्वीच्या १९९१ मधील नियमांनुसार चित्रपटांमध्ये अमली पदार्थांच्या व्यसनाचे उदात्तीकरण (ग्लोरिफिकेशन) किंवा समर्थन करणाऱ्या दृश्यांवर बंदी होती. मात्र, नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार, चित्रपटात नार्कोटिक्स ड्रग्स किंवा सायकोट्रॉपिक पदार्थांचे सेवन आणि तस्करीशी संबंधित कंटेंट असल्यास पडद्यावर स्पष्ट इशारा द्यावा लागणार आहे. "अवैध नशेचे पदार्थ आरोग्य बिघडवतात आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. ड्रग्सला नकार द्या", असा संदेश चित्रपटातील अशा दृश्यांदरम्यान दाखवणे आता निर्मात्यांना अनिवार्य असेल.

वयोमर्यादेसाठी ३ नवीन ‘एज मार्कर्स’ लागू

बालक आणि किशोरांच्या मानसिक आरोग्याचा विचार करून CBFC ने ‘UA’ श्रेणीअंतर्गत तीन नवीन एज मार्कर्स जोडले आहेत:

UA 7+

UA 13+

UA 16+

CBFC चे चेअरपर्सन शशि शेखर वेम्पती यांनी स्पष्ट केले की, चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या प्रमोशनल मटेरियलमध्ये (पोस्टर, ट्रेलर) हे एज मार्कर्स स्पष्टपणे प्रदर्शित करणे आवश्यक आहे. यामुळे पालकांना आपल्या पाल्यांना कोणता चित्रपट दाखवावा, याचा योग्य निर्णय घेणे सोपे होणार आहे.

जुन्या मुख्य तरतुदी कायम; १८ सदस्यांचे नवीन बोर्ड जाहीर

जरी ३५ वर्षांनंतर नियमावलीत बदल झाले असले, तरी हिंसाचार, अश्लीलता, लैंगिक हिंसा, सांप्रदायिक मजकूर आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित जुने मूलभूत नियम कायम ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने CBFC च्या १८ सदस्यांच्या नवीन बोर्डाची घोषणा केली आहे. या बोर्डात चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेते मनोज जोशी, सुनील शेट्टी, प्रीती झिंटा, पंकज त्रिपाठी, प्रसेनजीत चटर्जी, दिग्दर्शक प्रियदर्शन, संगीतकार रिकी केज यांच्यासह विनोद अनुपम, अभिषेक जैन, हंसराज हंस, सुप्रिया यारलागड्डा, यतींद्र मिश्रा, रूपाली गांगुली, नीला माधब पांडा, पल्लवी जोशी, निशिगंधा वाड, वामन केंद्रे आणि रमेश पतंगे यांचा समावेश आहे.