Ratnagiri Bank Strike: बँकांचा संप आणि सलग सुट्ट्या; २५ सप्टेंबरपूर्वी व्यवहार पूर्ण करण्याचे जिल्हा अग्रणी प्रबंधक कार्यालयाचे आवाहन

Ratnagiri Bank Strike: बँकांचा संप आणि सलग सुट्ट्या; २५ सप्टेंबरपूर्वी व्यवहार पूर्ण करण्याचे जिल्हा अग्रणी प्रबंधक कार्यालयाचे आवाहन

२६ ते ३० सप्टेंबरदरम्यान सलग ५ दिवस बँकिंग सेवा विस्कळीत राहण्याची शक्यता; डिजिटल माध्यमांचा वापर करण्याचा सल्ला

रत्नागिरी :

रत्नागिरी बँक संप पार्श्वभूमीवर युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सद्वारे येत्या २८, २९ व ३० सप्टेंबर रोजी देशभरात बँक संपाची हाक देण्यात आली आहे. या संपामुळे आणि त्याला जोडून येणाऱ्या शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमुळे बँकिंग सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या काळात नागरिकांची व ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा अग्रणी प्रबंधक कार्यालय, रत्नागिरी (बँक ऑफ इंडिया) यांच्याकडून महत्त्वाची सार्वजनिक सूचना जारी करण्यात आली आहे.

सलग ५ दिवस बँकिंग व्यवहार राहणार विस्कळीत

Tata altroz

येत्या २६ आणि २७ सप्टेंबर रोजी शनिवार व रविवारची नियमित साप्ताहिक सुट्टी आहे. त्यानंतर २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान देशभरात बँक संप असणार आहे. त्यामुळे २६ ते ३० सप्टेंबर या कालावधीत सलग पाच दिवस बँकांचे कामकाज प्रभावित होऊ शकते. या संभाव्य अडचणी टाळण्यासाठी ग्राहकांनी आपले सर्व महत्त्वाचे बँक व्यवहार २५ सप्टेंबरपूर्वीच पूर्ण करून घ्यावेत, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

रत्नागिरी बँक संप: रोख रकमेची सोय आणि डिजिटल सेवांचा वापर करण्याचे आवाहन

दैनंदिन खर्चासाठी रोख रकमेची आधीच सोय करा

संपाच्या काळात दैनंदिन आणि तातडीच्या खर्चासाठी आवश्यक असणाऱ्या रोख रकमेची (कॅश) आधीच सोय करून ठेवावी. तसेच गरजेनुसार एटीएमचा (ATM) वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर करा:

संपकाळात व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी ग्राहकांनी खालील डिजिटल सेवांचा वापर करावा:

इंटरनेट बँकिंग (Internet Banking)

मोबाईल बँकिंग (Mobile Banking)

यूपीआय (UPI / Online Payments)

एटीएम सेवा (ATM Services)

ग्राहकांची कमीत कमी गैरसोय व्हावी यासाठी बँकांकडून आवश्यक ती पर्यायी व्यवस्था केली जात आहे. तरीही संपकाळात प्रत्यक्ष शाखा आणि कार्यालयांचे कामकाज ठप्प राहू शकत असल्याने सर्व ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी प्रबंधक, रत्नागिरी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.