Guhagar Mahavitaran Seva Sankalp: गुहागरमध्ये महावितरणच्या ‘सेवा सेतू’ आणि ‘सेवा संकल्प’ अभियानाला उत्साहात प्रारंभ

Guhagar Mahavitaran Seva Sankalp: गुहागरमध्ये महावितरणच्या 'सेवा सेतू' आणि 'सेवा संकल्प' अभियानाला उत्साहात प्रारंभ

पीएम सूर्यघर आणि राज्य सरकारच्या योजनेमुळे १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा; तालुक्यातील १२२ गावांना होणार फायदा

गुहागर :

गुहागर महावितरण सेवा संकल्प अभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक व घटनात्मक पदावरील कार्यकाळाला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या औचित्याने वीज ग्राहकांना अधिक वेगवान आणि सुलभ सेवा देण्यासाठी महावितरण सरसावले आहे. याच पार्श्वभूमीवर गुहागर आगार येथे महावितरणतर्फे ”सेवा सेतू” आणि ”सेवा संकल्प” या विशेष अभियानाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. हे अभियान येत्या १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत राबवले जाणार असून प्रत्येक तालुक्यात विशेष सेवा कक्ष उभारण्यात आले आहेत.

१०० युनिट वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत विजेचा लाभ

Fitness

या विशेष अभियानामुळे दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ‘प्रधानमंत्री सूर्या घर मोफत वीज योजने’सोबतच राज्य सरकारची ‘स्मार्ट योजना’ अधिक लाभदायक ठरणार आहे. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून घरगुती वीज ग्राहकांना सौर ऊर्जेचा वापर करून वीजबिलातून मोठा दिलासा मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

गुहागर महावितरण सेवा संकल्प: मान्यवरांची उपस्थिती आणि अभियानाची व्याप्ती
गुहागर आगारात आयोजित या शुभारंभ कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख उपस्थिती:

गुहागरचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्निल चव्हाण

उपकार्यकारी अभियंता सुनील सूद

तळवळीचे कनिष्ठ अभियंता ऑल्विन फर्नांडिस

गुहागरचे सहाय्यक अभियंता ऋषिकेश शेट्ये व सौ. काजल नायक

शृंगारतळीचे सहाय्यक अभियंता बापू सोनवणे

गुहागरचे आगार प्रमुख स्वप्निल शिंदे

विद्युत ग्राहक संघटनेचे गुहागर तालुकाध्यक्ष पराग कांबळे

सावर्डे (सोलर) इंडोवेट एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे मंदार शेंबेकर

आबलोलीचे कनिष्ठ अभियंता सुजय निकम

गुहागरचे उच्चस्तरीय लिपिक महेश डिंगणकर

तालुक्यातील १२२ गावांना होणार प्रत्यक्ष फायदा

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना विद्युत ग्राहक संघटनेचे गुहागर तालुकाध्यक्ष पराग कांबळे यांनी सांगितले की, या अभियानाचा गुहागर तालुक्यातील तब्बल १२२ गावांना प्रत्यक्ष लाभ होणार आहे. ग्राहकांच्या समस्यांचे निवारण आणि सौर ऊर्जेचा प्रसार करणाऱ्या या मोहिमेला ग्राहक संघटनेचा कायम पाठिंबा राहील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.