Ganesh Visarjan Ratnagiri: आज अनंत चतुर्दशीला जिल्ह्यातील ३६ हजार २४७ गणरायांना निरोप!

Ganesh Visarjan Ratnagiri: आज अनंत चतुर्दशीला जिल्ह्यातील ३६ हजार २४७ गणरायांना निरोप!

मांडवी किनाऱ्यासह सर्व तालुक्यांत चोख बंदोबस्त

रत्नागिरी : आज गणरायांना निरोप देण्यासाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून, अनंत चतुर्दशीच्या दिवशी जिल्ह्यातील ७२ सार्वजनिक आणि ३६ हजार १७५ घरगुती अशा एकूण ३६ हजार २४७ गणपतींचे भक्तिभावाने विसर्जन होणार आहे. "निरोप घेता आता तुम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी…" असे गाऱ्हाणे घालत ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला जाईल. १४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र सार्वजनिक १२६ आणि १ लाख ६९ हजार ५३८ खाजगी अशा एकूण १ लाख ६९ हजार ६६४ गणरायांचे आगमन झाले होते. त्यानंतर १७ सप्टेंबरला गौराईचे आगमन, १८ सप्टेंबरला गौरीपूजन आणि १९ सप्टेंबरला पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन पार पडल्यानंतर आता २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीचा मुख्य विसर्जन सोहळा पार पडत आहे.

गणेश विसर्जन रत्नागिरी विसर्जन घाट आणि पोलीस सुरक्षा व्यवस्था
जिल्ह्यातील मांडवी समुद्रकिनारी सायंकाळच्या वेळी विसर्जनासाठी अथांग जनसागर लोटण्याची शक्यता आहे. रत्नागिरी शहरासह साळवी स्टॉप, मारुती मंदिर, माळनाका आणि परटवणे या भागांतील गणेशभक्त मोठ्या संख्येने मांडवी किनाऱ्यावर दाखल होतात. ही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मांडवी आणि भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहर आणि परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलीस दलाकडून विशेष वाहतूक नियोजन लागू करण्यात आले आहे. रत्नागिरीसह मंडणगड, खेड, दापोली, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या सर्व तालुक्यांमध्येही बाप्पाला उत्साहात निरोप देण्याची तयारी पूर्ण झाली आहे.

गणेश विसर्जन रत्नागिरी प्रशासकीय तयारी, कृत्रिम तलाव आणि जीवरक्षक
सार्वजनिक आणि खाजगी विसर्जन स्थळांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक प्रशासन, नगर परिषद आणि पोलीस दल सतर्क झाले आहे. विसर्जन घाटांवर सुरक्षेच्या दृष्टीने जीवरक्षक, आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर तैनात करण्यात आली आहे. याशिवाय पर्यावरणपूरक विसर्जनास प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासनाकडून ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची विशेष सोय करण्यात आली आहे.

Tata motars tiago