Chiplun Seva Sankalp Abhiyan: चिपळूणच्या तीन वर्षांच्या हर्षालीला ‘सेवा संकल्प अभियाना’तून नवे आयुष्य; मोफत शस्त्रक्रियेनंतर ओठांवर फुलले हास्य!

Chiplun Seva Sankalp Abhiyan: चिपळूणच्या तीन वर्षांच्या हर्षालीला ‘सेवा संकल्प अभियाना’तून नवे आयुष्य; मोफत शस्त्रक्रियेनंतर ओठांवर फुलले हास्य!

चिंचघरी आग्रेवाडीतील चिमुकलीवर डेरवणच्या वालावलकर हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया; जिल्हा व तालुका आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रकृतीची पाहणी

Chiplun Seva Sankalp Abhiyan: शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या आरोग्य तपासणी मोहिमेत चिपळूण तालुक्यातील चिंचघरी आग्रेवाडी अंगणवाडीतील तीन वर्षांची चिमुरडी हर्षाली सीताराम मोरे हिला नवीन हास्य मिळाले आहे. तपासणीदरम्यान हर्षालीमध्ये ‘दुभंगलेले ओठ आणि टाळू’ (क्लेफ्ट लिप व पॅलेट) हा जन्मजात दोष आढळून आला होता.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून मोफत शस्त्रक्रिया
आरोग्य तपासणीत जन्मजात दोष निष्पन्न झाल्यानंतर ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा’च्या (RBSK) समन्वयातून तात्काळ पावले उचलण्यात आली. डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर हॉस्पिटलच्या योजनेंतर्गत लहानग्या हर्षालीवर यशस्वी आणि पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. या वेळेवर मिळालेल्या उपचारांमुळे चिमुकलीच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद पसरला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष भेट व प्रकृतीची विचारपूस
शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर Chiplun Seva Sankalp Abhiyan अंतर्गतातील या लहानग्या लाभार्थीच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जिल्हा व तालुका आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिच्या घरी प्रत्यक्ष भेट दिली. या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. यतीन मयेकर, डॉ. गायत्री फडके तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका हल्ये हे उपस्थित होते.

Shiva optical

पालकांना मार्गदर्शन आणि कुटुंबीयांकडून कृतज्ञता
उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हर्षालीच्या आरोग्याची सविस्तर पाहणी करून तिच्या पुढील देखभाल व आहाराबाबत पालकांना आवश्यक मार्गदर्शन केले. वेळेवर झालेली आरोग्य तपासणी आणि तत्पर वैद्यकीय उपचारांमुळे चिमुकल्या हर्षालीला नवीन जीवन मिळाल्याने तिच्या कुटुंबीयांनी आरोग्य विभाग व राज्य सरकारच्या या अभियानाप्रति मनापासून आभार व कृतज्ञता व्यक्त केली आहे.