महिला शेतकरी सन्मान योजनेसह कृषी विभागाच्या योजनांवर मार्गदर्शन; जिल्हा माहिती कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम
Jaitapur Loksamvad Program: धार्मिक उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन साधण्यासाठी आणि शासकीय योजनांची माहिती थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने राजापूर तालुक्यातील जैतापूर येथील ‘जैतापूरचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिला शेतकरी सन्मान योजनेसह कृषी व इतर शासकीय विभागांच्या विविध योजनांविषयी ग्रामस्थांना सविस्तर माहिती देण्यात आली.
कृषी व महिला सक्षमीकरण योजनांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना सहाय्यक कृषी अधिकारी विशाल शिंदे यांनी कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, अनुदाने आणि आधुनिक शेतीविषयक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. नाटे विभागाच्या सुपरवायझर स्नेहल डांगमोडेकर-जाधव यांनी महिला शेतकरी सन्मान योजना व महिला सक्षमीकरणाच्या योजनांवर प्रकाश टाकत, जास्तीत जास्त महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.
स्थानिक लोकप्रतिनिधी व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या Jaitapur Loksamvad Program प्रसंगी सागवे जिल्हा परिषद सदस्य सोनाली ठुकरूल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच ‘जैतापूरचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष गिरीश करगुटकर यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक महिला शेतकरी, ग्रामस्थ आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनहितार्थ उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक
गणेशोत्सवाच्या या पवित्र काळात जनकल्याणाच्या विविध योजनांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. अशा माहितीपर उपक्रमांमुळे शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होत असल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.













