हॅप्पी ढाब्यासमोरील घटना; जखमी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
Khed Bike Accident: खेड तालुक्यातील कळंबणी येथे बुधवारी रात्री ९.५० वाजता दुचाकीवरील चालकाचे अचानक ताबा सुटल्याने भीषण अपघात घडला आहे. या दुर्घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हॅप्पी ढाब्यासमोर घडला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी (क्रमांक: MH 08 AZ 1367) वरून कळंबणी येथून खेडच्या दिशेने जात असताना हॅप्पी ढाब्यासमोर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकीचा मोठा अपघात झाला. या अपघातात गणेश वजरे (वय २६, रा. कळंबणी) हे गंभीर जखमी झाले आहेत.

देवदूतासारखी धावून आली नरेन्द्राचार्यजी संस्थानची रुग्णवाहिका
अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली २४ तास अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी तैनात असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेन्द्राचार्यजी संस्थान, नाणीज धाम यांची विनामूल्य रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. Khed Bike Accident मधील गंभीर जखमी गणेश वजरे यांना रुग्णवाहिकेचे चालक सुरज हंबीर यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.













