Ratnagiri Senior Citizen Suicide: रत्नागिरीत वृद्धाची घरात गळफास घेऊन आत्महत्या; सुभाष रोड परिसरातील घटना

Ratnagiri Senior Citizen Suicide: रत्नागिरीत वृद्धाची घरात गळफास घेऊन आत्महत्या; सुभाष रोड परिसरातील घटना

हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच घोषित केले मृत; पोलिसांत घटनेची नोंद

Ratnagiri Senior Citizen Suicide: रत्नागिरी शहरातील सुभाष रोड, वरची आळी परिसरात एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका ६५ वर्षीय वृद्धाने राहत्या घरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे. रविलाल देवजी पटेल (वय ६५, रा. घर नं. २३२३ अ, सुभाष रोड वरची आळी, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे.

राहत्या घरात उचलले टोकाचे पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२:४६ वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरातील छताच्या लाकडी वाशाला पिवळ्या रंगाची नायलॉनची दोरी बांधली. त्यानंतर गळ्यामध्ये काळ्या रंगाचा नॅपकिन गुंडाळून, त्याभोवती नायलॉन दोरीचा फास आवळून त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचे मूळ कारण अद्याप समजू शकलेले नाही.

रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी दुपारी २:१९ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल), रत्नागिरी येथे दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले.

Rotary School

या घटनेप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.