Konkan Marathi Sahitya Sammelan Office: रत्नागिरीत ‘कोमसाप’च्या १८ व्या केंद्रीय साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्या उद्घाटन; पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार शुभारंभ

Konkan Marathi Sahitya Sammelan Office: रत्नागिरीत 'कोमसाप'च्या १८ व्या केंद्रीय साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्या उद्घाटन; पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार शुभारंभ

मालगुंड येथे २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान भरणार साहित्य संमेलन; मारुती मंदिर परिसरातील साईरत्न कॉम्प्लेक्समध्ये सुरू होणार मुख्य कार्यालय

Konkan Marathi Sahitya Sammelan Office: कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) १८ व्या केंद्रीय साहित्य संमेलनाच्या मुख्य कार्यालयाचे रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरातील साईरत्न कॉम्प्लेक्समध्ये शनिवारी, २६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता औपचारिक उद्घाटन होणार आहे. राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते या कार्यालयाचा शुभारंभ केला जाणार आहे.

मालगुंडमध्ये २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान साहित्य संमेलन
कोमसापचे १८ वे केंद्रीय साहित्य संमेलन येत्या २७, २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी मालगुंड (ता. रत्नागिरी) येथील प्रसिद्ध कवी केशवसुत स्मारक संकुलात पार पडणार आहे. या संमेलनाच्या भव्य पूर्वतयारीसाठी आणि नियोजनासाठी हे मध्यवर्ती कार्यालय सुरू करण्यात येत आहे. कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी कोमसापचे सल्लागार व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तानाजीराव चोरगे, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर आणि केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

साहित्यप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन
या उद्घाटन सोहळ्याला कोकणातील आणि जिल्ह्यातील साहित्यप्रेमी, लेखक, कवी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अठराव्या केंद्रीय साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये आणि कार्यवाह गजानन पाटील यांनी केले आहे.

Rotary School