Nayari Mobile Network Problem: नायरी गावात मोबाईल नेटवर्कचा बोजवारा; बीएसएनएलकडे ग्रामस्थांचे निवेदन

Nayari Mobile Network Problem: नायरी गावात मोबाईल नेटवर्कचा बोजवारा; बीएसएनएलकडे ग्रामस्थांचे निवेदन

अनेक महिन्यांपासून कनेक्टिव्हिटी पूर्णपणे ठप्प; समस्या तात्काळ न सोडवल्यास आंदोलनाचा इशारा

Nayari Mobile Network Problem: संगमेश्वर तालुक्यातील नायरी गावातील मोबाईल नेटवर्कची समस्या दिवसेंदिवस अत्यंत गंभीर बनली आहे. गावातील ही नेटवर्कची अडचण तातडीने सोडवावी, या मागणीसाठी नायरी ग्रामस्थांनी भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) संगमेश्वर विभागीय व्यवस्थापकांना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.

मोबाईल सेवा वारंवार ठप्प; दैनंदिन कामे खोळंबली

गेल्या अनेक महिन्यांपासून नायरी गावात मोबाईल कनेक्टिव्हिटी अत्यंत खराब आहे. अनेकदा मोबाईल सेवा पूर्णपणे बंद पडत असल्याने बँक व्यवहार, विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण आणि आपत्कालीन संपर्कासाठी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Tata motars punch

प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप

गावातील नेटवर्कच्या समस्येकडे वारंवार लक्ष वेधूनही बीएसएनएल प्रशासनाकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने या समस्येकडे अधिक दुर्लक्ष न करता नायरी गावातील मोबाईल नेटवर्क सुरळीत करण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.