Raj Thackeray Uddhav Thackeray Morcha Mumbai: ज्ञानेश कुरांविरोधात ठाकरे बंधू एकत्र: ४ ऑक्टोबरला मुंबईत महामोर्चाची घोषणा; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

Raj Thackeray Uddhav Thackeray Morcha Mumbai: ज्ञानेश कुरांविरोधात ठाकरे बंधू एकत्र: ४ ऑक्टोबरला मुंबईत महामोर्चाची घोषणा; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

राज आणि उद्धव ठाकरेंचे सर्वपक्षीय नेत्यांना आणि जनतेला सहभागी होण्याचे आवाहन; ‘कॉकरोच जनता पार्टी’चाही २ ऑक्टोबरचा अल्टिमेटम

मुंबई:
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात आणि मतदार यादीतील कथित गैरव्यवहारांच्या (SIR) मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. काँग्रेसच्या देशभरातील आंदोलनांनंतर आता ठाकरे बंधू – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे – ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात एकत्र आले आहेत. येत्या ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत एका भव्य ‘जनमोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान निवडणूक आयुक्तांविरोधात संयुक्त मोर्चा काढण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली, ज्यानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे या महामोर्चाची अधिकृत घोषणा केली.

"हा एका पक्षाचा नाही, तर लोकशाही वाचवण्यासाठी जनतेचा मोर्चा": राज ठाकरे
राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे सर्व राजकीय पक्षांना आणि आम जनतेला या मोर्च्यात सहभागी होण्याचे थेट आवाहन केले आहे. पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले:

Tata sierra

"देशातील सत्ताधारी पक्षाची जणू काही आपण शाखाच आहोत, अशा पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’च्या (SIR) नावाखाली मतदारांची जी घोर फसवणूक केली आहे, त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (UBT) येत्या ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत एक जनमोर्चा काढत आहेत. हा मोर्चा केवळ एका पक्षापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज ठरेल. देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे."

या मोर्चाची वेळ आणि मार्ग लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘कॉकरोच जनता पार्टी’चा २ ऑक्टोबरचा अल्टिमेटम
दुसऱ्या बाजूला, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे नेते अभिजीत दीपके यांनीही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दीपके यांनी ट्विट करत ज्ञानेश कुमार यांना २ ऑक्टोबर २०२६ पूर्वी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्ये तीव्र निदर्शने आणि आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

नीट (NEET) परीक्षेच्या मुद्द्यावरून आधीच विरोधक आक्रमक असताना, आता मतदार यादीतील कथित त्रुटी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ठाकरे बंधूंची ही एकत्र येण्याची भूमिका केंद्र सरकारची डोकेदुखी वाढवणारी ठरणार आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शासन ज्ञानेश कुमार यांच्यावर काय कारवाई करते, की त्यांना अभय देते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.