Devrukh News: देवरूखात मध्यरात्री थरार; घरात शिरलेला ५.५ फूट लांबीचा अजगर पकडला

Devrukh News: देवरूखात मध्यरात्री थरार; घरात शिरलेला ५.५ फूट लांबीचा अजगर पकडला

हेल्प फोर्सच्या टीमने सुखरूप दिले नैसर्गिक अधिवासात जीवनदान

देवरुख : असून देवरुख येथील रहिवासी योगेश गुरव यांच्या घरी शनिवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास एका विशाल अजगराच्या दर्शनाने घरातील सदस्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सुमारे ५.५ फूट लांबीचा हा अजगर अचानक घरात शिरल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच प्राणीमित्रांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून अजगराला सुखरूप पकडून सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

हेल्प फोर्सच्या रक्षकांनी मध्यरात्री धाव घेत केले रेस्क्यू
योगेश गुरव यांनी घरात अजगर शिरल्याचे पाहताच तात्काळ स्थानिक प्राणीमित्र ‘हेल्प फोर्स’ टीमशी संपर्क साधला. माहिती मिळताच मध्यरात्रीच्या सुमारास हेल्प फोर्सचे रक्षक आर्य बेर्डे, प्रमोद पुसाळकर आणि दुर्वांकुर बेर्डे यांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली. मध्यरात्रीची वेळ आणि अजगराचा मोठा आकार यामुळे बचावकार्यात मोठे आव्हान निर्माण झाले होते.

अजगराला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडले
हेल्प फोर्सच्या तिन्ही रक्षकांनी धैर्याने, कौशल्याने व सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेत अवघ्या काही वेळात या ५.५ फुटांच्या अजगराला सुखरूप पकडले. अजगराला सुरक्षितरीत्या ताब्यात घेतल्यानंतर त्याला जंगलातील त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूपपणे सोडण्यात आले. प्राणीमित्रांच्या या तत्परतेमुळे आणि यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनमुळे गुरव कुटुंबासह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Amey jwelrs