Lalbaugcha Raja: मुंबईतील लालबागच्या राजाचे रत्नागिरीतील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी घेतले दर्शन; रत्नागिरीच्या विकासासाठी प्रार्थना

Lalbaugcha Raja: मुंबईतील लालबागच्या राजाचे रत्नागिरीतील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी घेतले दर्शन; रत्नागिरीच्या विकासासाठी प्रार्थना

भैरी देवस्थानचे विश्वस्त विजय खेडेकर व नगरसेविका वैभवी खेडेकर यांच्यासह मान्यवरांची लालबागच्या राजाच्या चरणी प्रार्थना

मुंबई : मुंबईतील नवसाला पावणारा आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja) रत्नागिरीतील लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अतिशय भक्तिभावाने दर्शन घेतले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी लालबागच्या राजाच्या चरणी लीन होऊन श्रींचे शुभ आशीर्वाद घेतले.

रत्नागिरीच्या लोकप्रतिनिधींची विशेष उपस्थिती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या या विशेष शिष्टमंडळात भैरी देवस्थानचे विश्वस्त विजय खेडेकर, प्रभाग क्रमांक १ च्या नगरसेविका वैभवी खेडेकर, नगरसेविका पूजा पवार, नगरसेविका श्रद्धा हळदणकर आणि विभाग प्रमुख संजय हळदणकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेत पूजा-अर्चा केली.

शहर विकास आणि सुख-समृद्धीसाठी साकडे
लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत मान्यवरांनी संपूर्ण महाराष्ट्रासह रत्नागिरीकरांच्या आरोग्य, सुख-समृद्धी आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली. तसेच रत्नागिरी शहराचा सर्वांगीण विकास वेगाने व्हावा आणि नागरिकांच्या अडचणी दूर व्हाव्यात, असे साकडे यावेळी लालबागच्या राजाला घालण्यात आले.

Tata nexon