Ratnagiri : गणेशोत्सव सजावटीतून भविष्यात उत्तम व्यावसायिक नेपथ्यकार आणि शिल्पकार घडावेत; पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन

Ratnagiri : गणेशोत्सव सजावटीतून भविष्यात उत्तम व्यावसायिक नेपथ्यकार आणि शिल्पकार घडावेत; पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन

‘कांचन डिजिटल’ घरगुती गणेश सजावट व मंगळागौर स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

रत्नागिरी : गणेशोत्सव सजावट स्पर्धेकडे केवळ एक पारंपरिक स्पर्धा म्हणून न बघता, या उपक्रमातून भविष्यात उत्तम दर्जाचे व्यावसायिक कलाकार, शिल्पकार आणि नेपथ्यकार निर्माण झाले पाहिजेत, असे प्रतिपादन उद्योग व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

‘कांचन डिजिटल’ आयोजित घरगुती गणेश सजावट आणि मंगळागौर स्पर्धेच्या दिमाखदार पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

कौशल्याला योग्य व्यासपीठ आणि रोजगाराच्या संधी
आपल्या भाषणात जुन्या आठवणींना उजाळा देत पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, लहानपणी पाली येथे राहताना आवंतकर कुटुंबाची गणेशमूर्ती कार्यशाळा जवळून अनुभवली. साच्याचा वापर न करता केवळ हाताने अत्यंत सुबक गणेशमूर्ती तयार करण्याचे अप्रतिम कौशल्य कोकणातील कारागिरांकडे आहे. पेण, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बनणाऱ्या या वैशिष्ट्यपूर्ण मूर्तींना जगभरात आणि दिल्लीतही मोठी मागणी असते.

Tata motars punch

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधील ग्रामीण कलाकारांचे उदाहरण देत त्यांनी पालकांना आवाहन केले की, मुलांमधील कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. आजच्या काळात इव्हेंट मॅनेजमेंट आणि नेपथ्य क्षेत्रात रोजगाराच्या अफाट संधी उपलब्ध असून, हातामध्ये खरी कला असेल तर कलाकार स्वतःच्या मेहनतीचा पूर्ण मोबदला मिळवू शकतो.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या सोहळ्याला राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण तथा भैया सामंत, श्री भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना शेठ सुर्वे, नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे, न.प. समाजकल्याण सभापती विजय खेडकर, ज्येष्ठ उद्योजक प्रसन्न शेठ आंबुलकर, मुकेश गुंदेचा, गणेश धुरी, गौरांग आगाशे, ओंकार रहाटे, सौ. रक्षा घाग, कामगार नेते सुनील साळवी, तसेच स्पर्धेचे संयोजक कांचन मालगुंडकर व मंथन माalgुंडकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेचे निकाल आणि विजेते कलाकार
यंदा या स्पर्धेत प्रथमच ‘चलचित्र’ आणि ‘आरास-सजावट’ असे दोन स्वतंत्र विभाग करण्यात आले होते.

१. चलचित्र विभाग (देखावे):
प्रथम क्रमांक: संदीप मेस्त्री, सडेवाडी-जयगड (श्री स्वामी समर्थांचा दिव्य प्रकटावतार)

द्वितीय क्रमांक: मयूर सुरेश भितळे, सोमेश्वर (हिरकणी देखावा)

तृतीय क्रमांक: दीपक मेस्त्री, मिरजोळे (भक्त पुंडलिक)

२. आरास / सजावट विभाग:
प्रथम क्रमांक: अनिकेत सुपल, सह्याद्रीनगर-नाचणे (बारा ज्योतिर्लिंग)

द्वितीय क्रमांक: स्वप्नील ठिक, तिवंडेवाडी-शिरगाव (ग्रामीण घर – वारली पेंटिंग)

तृतीय क्रमांक: अजय पारकर, मावळंगे-गजनेवाडी (दगडावर चित्रकला)

सुबक मूर्तिकार: वैभव लिंगायत (राजेश लिंगायत यांच्या घरचा गणपती)

विशेष उल्लेखनीय पारितोषिके:
चारुदत्त धालवलकर (गावखडी – संत ज्ञानेश्वरांनी चालवली भिंत), जीवन कोळवणकर (कुवारबाव – गोकर्ण महाबळेश्वर कथा), साईराज वाडकर (मिरजोळे – छ. शिवाजी महाराज – भवानी तलवार), घाटकर परिवार (शेडगेवाडी-पावस – अन्नभेसळ समाजप्रबोधन).

उत्तेजनार्थ पारितोषिके:
साईराज पोटफोडे (जुनी तांबटआळी – पुरातन मंदिर), निखिल साळवी (गावखडी – सुंभ आरास), आग्रे परिवार (पावस – एकविरा माता मंदिर), संकेत पाटील (रेडिएशन दुष्परिणाम).

प्रोत्साहनपर विजेते:
अथर्व सावंत (नाचणे), विशाल शिंदे (सोमेश्वर), किशोर जोशी (मिरजोळे), सागर पुसाळकर (निवखोल), ओंकार कांबळे (भाटिमिर्या), चैतन्य खेडेकर (बंदररोड), दीक्षा रसाळ (वरचीआळी), सुरेश सनगरे (परटवणे), यश आंब्रे (गावडे आंबेरे), आध्या शिर्सेकर (भाट्ये), ओम तोडणकर (कुर्ली), सार्थक मुरकर (फणसोप) आणि महेश सुतार (गावखडी सुतारवाडी).

मंगळागौर स्पर्धा विजेते:
प्रथम क्रमांक: रंग माळयीला (कलासार्थ)

द्वितीय क्रमांक: श्री रामेश्वर कालिका (काळबादेवी)

तृतीय क्रमांक: श्री स्वामी समर्थ (शिरगाव)

कार्यक्रम प्रसंगी सहकार्य करणाऱ्या उद्योजकांचा व मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक कांचन मालगुंडकर यांनी केले, सूत्रसंचालन प्रथमेश साळवी यांनी केले तर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.