वयाची ७५ ते ९५ वर्षे पूर्ण केलेले सभासद आणि सुवर्ण महोत्सवी दाम्पत्यांचा होणार सन्मान
रत्नागिरी :
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन निमित्त रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी विशेष कार्यक्रमाचे आणि सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
हा कार्यक्रम १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमादरम्यान वयाची ७५, ८०, ८५, ९० आणि ९५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासदांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय, ज्या सभासद दाम्पत्यांच्या वैवाहिक सहजीवनाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा सुवर्ण महोत्सवी दांपत्यांचाही यावेळी यथोचित सन्मान करण्यात येईल.

ज्येष्ठ नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी संघाच्या सर्व सभासदांना या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे आणि सत्कारमूर्तींचा उत्साह वाढवण्याचे आवाहन केले आहे.













