Maharashtra Politics News: रोहित पवारांच्या दाव्याला नितेश राणेंचे प्रत्युत्तर; “शेवटच्या श्वासापर्यंत भाजपसोबतच, तारीख-वेळ जाहीर करा”

Maharashtra Politics News: रोहित पवारांच्या दाव्याला नितेश राणेंचे प्रत्युत्तर; "शेवटच्या श्वासापर्यंत भाजपसोबतच, तारीख-वेळ जाहीर करा"

MPSC विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरून राजकीय कलगीतुरा; सनदी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात सक्षम समिती स्थापन

*मुंबई :* महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या MPSC विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि त्यावरील राजकीय वक्तव्यांमुळे वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यात राजकीय पक्षांतराच्या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. “नितेश राणे भाजप सोडतील आणि आमच्यासोबत मंत्री म्हणून दिसतील,” या रोहित पवारांच्या वक्तव्याचा नितेश राणे यांनी खरपूस समाचार घेतला असून, “मी शेवटच्या श्वासापर्यंत भाजपसोबतच राहीन,” असा स्पष्ट पुनरुच्चार केला आहे.

*”वेलकम ब्रो”वर नितेश राणेंचा पलटवार*
एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या रोहित पवारांचे कौतुक करत नितेश राणे यांनी ते मंत्रिमंडळात सहकारी म्हणून दिसू शकतात असे विधान केले होते. त्यावर रोहित पवारांनी टोला लगावत, “नितीश भाऊ भाजप सोडतील, ते आमच्यासोबत आले तर ‘वेलकम ब्रो'” असे उत्तर दिले होते. यावर प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, “माझ्याबद्दल इकडच्या-तिकडच्या गोष्टी करून वेळ मारून नेण्यापेक्षा तुम्हाला माहिती असलेली वेळ आणि तारीख थेट जाहीर करा. अशा धमक्यांनी भारतीय जनता पक्षाला काहीही फरक पडत नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत इथेच (भाजप) आहे.”

*MPSC संदर्भात वी. राधा व रामस्वामी यांच्या नेतृत्वात समिती*
पेपरफुटीचे आरोप आणि MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या मुद्द्यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, हा विषय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेला आहे. त्यामुळे याकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या हितासाठी तातडीने पावले उचलली असून, सचिवांची बदली करण्यात आली आहे. तसेच ज्येष्ठ सनदी अधिकारी वी. राधा मॅडम आणि रामस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली एका सक्षम

Shanti real estate 1