रत्नागिरी :
सामाजिक बांधिलकी जपत ‘लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी’च्या वतीने रत्नागिरी विशेष कारागृहात बंदिवानांसाठी भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. या स्तुत्य उपक्रमाचे लोकार्पण लायन्स क्लबचे रिजन चेअरमन डॉ. निलेश पाटील यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
बंदिवानांना रोजगाराची संधी आणि स्वावलंबनाचा ध्यास :
रत्नागिरी विशेष कारागृहातील बंदिवानांना नवीन कौशल्य आत्मसात करता यावे, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी आणि भविष्यात स्वावलंबी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उदात्त हेतूने लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उपस्थित मान्यवर आणि कारागृह प्रशासनाकडून विशेष कौतुक करण्यात आले.
लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांची व सभासदांची उपस्थिती :
या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी झोन चेअरपर्सन एमजेएफ शिल्पा पानवलकर, डॉ. संतोष बेडेकर, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष लायन सुमीत ओसवाल, सचिव लायन ललित शहा, खजिनदार लायन प्रदीप हरचिरकर, माजी अध्यक्ष लायन संजय पटवर्धन, लिओ अध्यक्ष अमृत गोरे व चिन्मय प्रभू, लायन शरद नागवेकर, लायन मनोज सावंत यांच्यासह क्लबचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.














