इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्याची क्रीडा क्षेत्रात कामगिरी; आमदार शेखर निकम यांच्याकडून कौतुक व सहकार्याचा हात
Chiplun Sports News समोर आली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील आकले गुरववाडी येथील अवघ्या १७ वर्षीय आदित्य प्रदीप जाधव याने आपल्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याची राज्यस्तरावर निवड झाली असून, हरियाणा येथील दवलतपूर येथे ८ ते १० डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या चौथ्या इंटरनॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत तो सहभागी होणार आहे.
आदित्य हा सध्या इयत्ता बारावीमध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरी करत त्याने कमी वयात ही कामगिरी केली आहे.
Chiplun Sports News: आमदार शेखर निकम यांच्याकडून कौतुक आणि सहकार्य
कमी वयात मिळवलेल्या या यशाबद्दल चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी आदित्यचे विशेष कौतुक केले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सहभागासाठी आमदार निकम यांनी त्याला मोलाचे सहकार्य व मदतीचा हात दिला आहे.

यावेळी आमदार शेखर निकम यांनी आदित्यचे अभिनंदन करून आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. आदित्यने स्पर्धेत उत्तम कामगिरी करून आपल्या गावाचे, चिपळूण तालुक्याचे आणि रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी स्वप्नील शिंदे आणि दिनेश शिंदे उपस्थित होते.













